...म्हणून हसत-हसत नदीमध्ये महिलेने घेतली उडी, जीवन संपवण्यापूर्वी शेअर केला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:19 AM2021-03-01T10:19:32+5:302021-03-01T11:21:18+5:30

Girl committed suicide Sabarmati river : ती म्हणाली की, जेवढं आयुष्य मिळालं. आनंदी आहे. आता तिला देवाला भेटायचं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Girl committed suicide made video on Sabarmati river bank in Ahmedabad | ...म्हणून हसत-हसत नदीमध्ये महिलेने घेतली उडी, जीवन संपवण्यापूर्वी शेअर केला व्हिडीओ!

...म्हणून हसत-हसत नदीमध्ये महिलेने घेतली उडी, जीवन संपवण्यापूर्वी शेअर केला व्हिडीओ!

Next

गुजरातच्याअहमदाबादमध्ये एका विवाहितेने साबरमती नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या(Girl committed suicide Sabarmati river) केली. तिने आत्महत्या करण्याआधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात ती म्हणाली की, जेवढं आयुष्य मिळालं. आनंदी आहे. आता तिला देवाला भेटायचं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

आयशा असं महिलेचं नाव असून ती व्हिडीओत म्हणाली की, 'हॅलो माझं नाव आयशा आरिफ खान आहे. मी जे काही करणार आहे ते मी माझ्या मर्जीने करत आहे. यासाठी कुणीही माझ्यावर दबाव टाकला नाही. असं समजा की देवाने दिलेलं आयुष्य इतकंच होतं आणि जेवढं आयुष्य मिळालं आनंदी होतं. आणि डॅड कधीपर्यंत लढणार तुम्ही? केस विड्रॉल करा'. (हे पण वाचा : जिवंत आईस मृत सांगून मुलीने सर्व मालमत्ता केली हडप; पोलिसांनी केली अशी अटक )

आयशा पुढे म्हणाली की, 'एक गोष्टी नक्की शिकले की, प्रेम करायचंय तर दोन्ही बाजूने करा. कारण एकतरफी प्रेमातून काही मिळत नाही. प्रेम तर लग्नानंतरही अपूर्ण राहतं. प्रिय नदी, प्रार्थना करते की, तू मला तुझ्यात सामावून घेशील. माझ्यानंतर जे होईल, कृपया जास्त गोंधळ करू नका'. (हे पण वाचा : धक्कादायक! कुऱ्हाडीने घाव घालून आधी केली बायकोची हत्या; गळफास घेत नवऱ्याची आत्महत्या)

'मी हवेसारखी आहे. बस वाहत रहायचं आहे. कुणासाठी थांबायचं नाही. मी आनंदी आहे की, आजच्या दिवशी मला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी होती ती मिळाली. मला ज्याला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. थॅंक्यू मला आशीर्वादात आठवत रहा. माहीत नाही जन्नत मिळेल की नाही. चला अलविदा'.

अहमदाबादमध्ये राहणारे आणि व्यवसायाने टेलर असलेले आयशाचे वडील लिकायत अली यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच लग्न २०१८ मध्ये जालौर, राजस्थान येथे राहणाऱ्या आरिफ खानसोबत झालं होतं. वडिलांचा आरोप आहे की, लग्नानंतर हुंड्यासाठी आयशाला त्रास दिला जात होता.

लिकायत अली यांनी आरोप केला आहे की, पैसे दिल्यानंतर आरिफच्या परिवाराचा पैशांचा हव्यास वाढला. काही महिन्यांपूर्वी आरिफ आयशाला अहमदाबाद सोडून गेला होता. आरिफ तर आयशासोबत फोनवरही बोलत नव्हता. काही दिवसांपूर्वी रागात आयशाने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. यावर आरिफ म्हणाला होता की, मरायचं असेल तर जाऊन मर.
 

Web Title: Girl committed suicide made video on Sabarmati river bank in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.