तरूणीने इन्स्टावर शोधली तिच्यासारखीच दिसणारी तरूणी, नंतर या कारणाने केली तिची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:04 PM2023-02-02T12:04:56+5:302023-02-02T12:06:57+5:30
आरोपी तरूणीचं काही कारणाने तिच्या परिवारासोबत भांडण सुरू होतं. याच कारणाने तिने तिचा मृत्यू झाला असं दाखवण्यासाठी खदीदजा ओ नावाच्या तरूणीची हत्या केली.
एका तरूणीने स्वत:ला मृत दाखवण्यासाठी तिच्यासारखी दिसणाऱ्या एका तरूणीची हत्या केली. आरोपी तरूणीने या तरूणीला इन्स्टावर शोधलं होतं. आरोपी तरूणीने 50 वेळा धारदार हत्याराने पीडित तरूणीवर हल्ला केला होता. हैराण करणारी बाब म्हणजे या गुन्ह्यात तिला तिच्या बॉयफ्रेंडने साथ दिली.
आरोपी तरूणीचं काही कारणाने तिच्या परिवारासोबत भांडण सुरू होतं. याच कारणाने तिने तिचा मृत्यू झाला असं दाखवण्यासाठी खदीदजा ओ नावाच्या तरूणीची हत्या केली. जेणेकरून तिच्या परिवाराला वाटावं की, आपल्या मुलीचा मृत्यू झाला.
23 वर्षीय शराबन के वर आरोप आहे की, तिने तिच्या वयाची ब्युटी ब्लॉगर खदीदजा ओ ची जर्मनीच्या इंगोस्डाटमध्ये गेल्यावर्षी हत्या केली होती.
चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खदीदजावर 50 वेळा धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. तिची मृतदेह शराबनच्या कारच्या मागच्या सीटवर आढळून आला होता. या कृत्यात शराबनचा बॉयफ्रेंड शेकीर के सुद्धा सामिल होता.
हत्येनंतर दोघेही लपून होते. जेव्हा पोलिसांना कारमध्ये खदीदजाचा मृतदेह सापडला तेव्हा याबाबत शराबनच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली होती. नंतर रिपोर्टमधून समोर आलं होतं की, मृत तरूणी ही खदीदजा होती.
याप्रकरणी गेल्या आठवड्यात पोलिसांनी शराबनला खदीदजाच्या हत्येसाठी आरोपी मानलं. कोर्टात वकिल म्हणाले की, शराबनने खदीदजाला इन्स्टावर शोधलं होतं. शराबनला अशी तरूणी हवी होती जी हुबेहूब तिच्यासारखी दिसेल. असंही समोर आलं की, शराबनने अशा अनेक तरूणींना संपर्क केला होता ज्या तिच्यासारख्या दिसत होत्या.
चौकशीतून समोर आलं की, शराबनने इन्स्टावर ब्युटी ब्लॉगर खदीदजाला मेसेज करून तिला कॉस्मेटिकबाबत विचारलं होतं. यादरम्यान शराबनने खदीदजाला भेटण्यासाठी बोलवलं होतं. ज्या दिवशी खदीदजाची हत्या झाली त्या दिवशी शराबनने आपल्या परिवारासमोर एक खोटी कहाणी सांगितली होती. ती म्हणाली होती की, ती तिच्या एक्स हसबंडला भेटायला जात आहे. पण ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटली. नंतर खदीदजाला कारमध्ये बसवून जंगलात घेऊन गेली आणि तिथे तिची हत्या केली. यानंतर शराबनने मुद्दामहून कार अशा ठिकाणी पार्क केली, जिथे ती सहजपणे शोधली जाईल.
पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा हे तर स्पष्ट झालं होतं की, मृत तरूणी ही शराबन नाहीये. त्यानंतर त्यांनी शराबनच्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती घेतली. त्यातून समोर आलं की, ती अशा अनेक तरूणींच्या संपर्कात होती ज्या तिच्यासारख्या दिसत होत्या. त्यानंतर पोलिसांनी शराबनला अटक केली.
पोलिसांनी सांगितलं की, हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्याचारा अजूनही शोध घेतला जात आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीतील लोकांनी आपली कुशलता दाखवली. हेच कारण आहे की, आरोपी आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली.