मुलीने लग्न लावून देण्याची मागणी करताच केला जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 07:08 PM2018-09-08T19:08:51+5:302018-09-08T19:10:40+5:30

या प्रकरणी केज ठाण्यात मुलगा, आईसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The girl demand for marry, and they tried to kill her | मुलीने लग्न लावून देण्याची मागणी करताच केला जिवे मारण्याचा प्रयत्न

मुलीने लग्न लावून देण्याची मागणी करताच केला जिवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

केज (बीड ) : मामाच्या गावी राहिलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिने लग्नाची मागणी करताच पुलावरून ढकलून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी केज ठाण्यात मुलगा, आईसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील गप्पेवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई वडील पुणे येथे वास्तव्यास असून, अल्पवयीन मुलगी सांगवी येथे मामाच्या घरी राहते. सदर मुलीस सुदामती सुभाष केदार, बबलु उर्फ रामकृष्ण लांब, कृष्णा नखाते यांनी तिचे लग्न अक्षय सुभाष केदार (रा. सांगवी)  सोबत करण्याचे आमिष दाखवून तिला व अक्षय केदार याला अक्षयच्या घरात कोंडून अनैतिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर अक्षय केदार याने पीडित अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. यातून ही मुलगी दोन महिन्याची गरोदर राहिल्याने तिने अक्षय केदार याची आई सुदामती केदार यांच्याकडे अक्षय सोबत तिचे लग्न लावून देण्याची मागणी केली. सुदामती केदार यांनी अल्पवयीन पीडित मुलीस घराजवळून जाणाºया नदीवरील पुलावरुन खाली ढकलून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मध्ये पीडिता जखमी झाली. हा प्रकार  ३० मे २०१७ च्या दुपारी तीन वाजल्यापासून ते  ३ सप्टेंबर २०१८ दरम्यान अक्षय केदार याच्या घरी घडला आहे.

पीडित मुलीने ही माहिती कळविल्यानंतर तिची आई पुणे येथून आली. शुक्रवारी रात्री केज पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरुन  अक्षय सुभाष केदार, सुदामती सुभाष केदार रा. सांगवी व बबलु रामकृष्ण लांब, कृष्णा नखाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे करत आहेत.
 

Web Title: The girl demand for marry, and they tried to kill her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.