हृदयद्रावक! आई-वडिलांच्या वाईट सवयीमुळे 19 महिन्यांच्या बाळाचा गेला जीव; 3 दिवस होती उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 12:27 PM2021-10-02T12:27:08+5:302021-10-02T12:35:48+5:30
Baby girl dies after parents ignores : पालकांची एक सवय बाळाच्या जीवावर बेतली आहे. आई-वडिलांच्या वाईट सवयीमुळे 19 महिन्यांच्या बाळाचा जीव गेला आहे.
घरामध्ये लहान मुलं असली की त्यांची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पालकांची एक सवय बाळाच्या जीवावर बेतली आहे. आई-वडिलांच्या वाईट सवयीमुळे 19 महिन्यांच्या बाळाचा जीव गेला आहे. तब्बल 3 दिवस मुलगी उपाशी असल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, कियारा कोनरॉय (Kiera Conroy) असं या मृत बाळाचं नाव आहे.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर टीव्ही पाहणे आणि गेम खेळल्यानंतर बाळाचे आई-वडील दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता झोपेतून उठले. धक्कादायक म्हणजे यावेळी आई-वडील बाळाला एका खोलीत सोडून दुसऱ्या खोलीत निघून गेले होते. स्कॉटलँडमधील Airdrie कोर्टाने बाळाच्या वडिलांना याप्रकरणी दोषी मानलं आहे. बाळाच्या वडिलांवर तिच्याकडे लक्ष न देणे आणि जाणूनबुजून तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. याशिवाय बाळाच्या आईवर आरोप होते, मात्र कोर्टाने तिची सुटका केली आहे.
बरेच दिवस तिला घरातील खोलीमध्ये एकटं ठेवलं
पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. यामध्ये मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी बाळाच्या आई-वडिलांनी तिला काही खायला देखील दिलं दिलं नव्हतं. याशिवाय बरेच दिवस तिला घरातील खोलीमध्ये एकटं ठेवलं होतं. बाळाच्या आईने सांगितलं की, तिला मुलीच्या मृत्यूचं खूप दु:ख आहे. आई-वडिलांच्या सवयीमुळेच या बाळाचा जीव गेला. बाळाच्या आईने घटनेच्या दिवशी सकाळच्या वेळी बाळाला दूध देण्यात आलं होतं असा दावा केला आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.