एक फूल दो माली! एक तरूणी पडली दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात, तिघेही झाले फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 09:28 AM2022-10-17T09:28:24+5:302022-10-17T09:28:54+5:30
Crime News : तरूणीच्या वडिलांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आता पोलिसांनी तिघांचाही शोध सुरू केला आहे. सध्या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्हाला रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरच्या गुंडे सिनेमाची आठवण नक्कीच होईल. इथे एक 25 वर्षीय तरूणी दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात पडली. नंतर तिघेही सोबत फरार झाले. तरूणीच्या वडिलांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आता पोलिसांनी तिघांचाही शोध सुरू केला आहे. सध्या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
स्थानिक लोकांनी सांगितलं की, तरूणी दोन्ही भावांवर जिवापाड प्रेम करते. जेव्हा घरातील लोकांना याबाबत समजलं तेव्हा घरात सगळे रागावले होते. तिघांना रागावण्यात आलं आणि हे सगळं प्रकरण थांबवण्यात आलं. पण तिघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की, तिघेही घर सोडून फरार झाले.
तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी लगेच त्यांचा शोध सुरू केला. चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की, दोन्ही भाऊ तरूणीला आपल्या मामाच्या घरी घेऊन गेली. यानंतर दोन्ही परिवारात चांगलाच वाद झाला. नंतर पोलिसांनी तरूणांच्या मामावरही गुन्हा दाखल केला. पण सध्या तिघे कुठे आहेत हे समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी सांगितलं की, तरूणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तिघांचा शोध घेणं सुरू केलं आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधलं जात आहे. लवकरच दोन्ही आरोपींना अटक केली जाईल. हे प्रकरण प्रेमाचं आहे. त्यामुळे पोलीस या घटनेकडून गंभीरतेने बघत आहेत.