विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:55 PM2020-08-21T12:55:48+5:302020-08-21T13:11:29+5:30
सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एका हॉटेलमध्ये 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे
तेलअवीव - इस्रायलच्या इलट शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एका हॉटेलमध्ये 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'मानवतेविरोधातील गुन्हा' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलगी घटना घडली तेव्हा नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. मुलीनेच या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी एका संशयिताकडे याबाबत अधिक चौकशी केली असता, मुलीवर बलात्कार करणारे अनेक जण होते असं त्याने सांगितलं. मुलीच्या सहमतीनेच शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
Sushant Singh Rajput Death Case : 'ही' व्यक्ती असणार सुशांतच्या संपत्तीचा वारसhttps://t.co/eyDWZ06QWa#SushantSinghRajputCase#SushantSinghRajputDeathCase
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही हॉटेलची गेस्ट नव्हती तर ती मित्रांसोबत दारू प्यायल्यानंतर वॉशरूममध्ये गेली होती. त्यानंतर मुलीला काही जण हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले आणि बलात्कार केला. हे सर्व आरोपी एकमेकांना ओळखतही नव्हते. एका संशयिताने एकेक आरोपी खोलीत गेला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं आहे.
वैद्यकीय मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी खोलीत गेले होते. नशेत असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या मेडिकल रिपोर्टची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे. या घटनेने इस्रायलच्या पंतप्रधानांना मोठा धक्का बसला आहे. हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे. त्याचा तीव्र निषेध करत असून आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लस तयार झाल्यानंतर सुरुवातीला ती 'या' लोकांना दिली जाणार?https://t.co/ig50fYOWZi#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...
तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती
"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल
"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"
धक्कादायक! पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहून मुलीची आत्महत्या
VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले