विरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; प्रियकराने डोक्यात बाटली फोडली म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 04:14 PM2023-03-23T16:14:42+5:302023-03-23T16:15:21+5:30
पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपीला केले अटक
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा :- विरारमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये एका परिसरात १९ वर्षीय पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर बुधवारी संध्याकाळी बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या दोन्ही आरोपीने प्रियकराच्या गळ्यातून सोन्याचे पेंडल खेचून पळून गेले. दोघेही ते सोन्याचे पेंडल विकण्यासाठी गेले पण कोणीही ते विकत घेतले नाही म्हणून दोन्ही आरोपी परत प्रियकर आणि तरुणी बसलेल्या ठिकाणी गेले. दोन्ही नराधम आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी विरोध करताना प्रियकराने बाजूला पडलेली काचेची बॉटल एका आरोपीच्या डोक्यावर मारली.
जखमी अवस्थेतील आरोपी व दुसरा आरोपी पळून गेले. ही माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी पोलीस पोहचले. त्याठिकानाहून मुलीला उपचारासाठी डॉक्टरकडे पाठवले आणि फरार दोन्ही आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एक आरोपी जखमी झाल्याने जवळच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेला असेल असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी व्हाट्सअपच्या ग्रुपवर ही माहिती टाकल्यावर एका डॉक्टरांनी असा आरोपी उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी जाऊन विरार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले आहे.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अश्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)