धक्कादायक! प्रियकराच्या अजब डिमांडला कंटाळून प्रेयसीने लावून घेतला गळफास, आईने केले अनेक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:34 PM2021-12-27T12:34:48+5:302021-12-27T12:35:27+5:30
Bihar Crime News : गेल्या २७ नोव्हेंबरला रांचीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणी अभ्यासात हुशार होती आणि नर्स बनून समाजाची सेवा करायची होती.
बिहारच्या (Bihar) औरंगाबादमधून (Aurangabad) प्रेम प्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका प्रियकराने प्रेयसीला गळफास (Girl Suicide) घेऊन आत्महत्या करण्यास भाग पाडलं आणि फरार झाला. आई आपल्या मुलीच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी फेऱ्या मारत आहे. आईने मुलीला गळफास घेण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकराविरोधातील सर्व पुरावे पोलिसांकड दिले आहेत. तरीही अजून पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही.
काय आहे प्रकरण?
गेल्या २७ नोव्हेंबरला रांचीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणी अभ्यासात हुशार होती आणि नर्स बनून समाजाची सेवा करायची होती. घटनेनंतर कुटुंबियांनी पोलिसांत अइल नावाच्या एका तरूणाला आरोपी बनवत तक्रार दाखल केली. मृत तरूणीच्या आईने पोलिसांना सांगितलं की, हा तरूण तिच्या मुलीला टॉर्चर करत होता. प्रेम सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेत होता आणि अजब मागण्या करत होता.
प्रेम सिद्ध करण्यासाठी करत होता टॉर्चर
त्यासोबतच तरूणीला एका रिंगमध्ये फोन उचलण्यास सांगत होता. फोन न उचलल्यावर दुसऱ्यासोबत बोलत असल्याचा आरोप करत तिला टॉर्चर करत होता. व्हिडीओ कॉल करून आजूबाजूचं व्हिज्युअल दाखवण्यास सांगत होता. त्याला संशय होता की, रांचीमध्ये दुसऱ्या मुलासोबत तिचं अफेअर सुरू आहे. दिवसभरातील अर्धावेळ तो तिला व्हिडीओ कॉल करत राहण्यास सांगत होता आणि नर्सिंगच्या ट्रेनिंगवरूनही टॉर्चर करत होता. या सर्व गोष्टींना कंटाळून तिच्या मुलीने गळफास घेतला.
सोशल मीडियावर होते सगळे पुरावे
पीडितच्या आईने अनेक ऑडिओ आणि व्हिडीओसोबतच आरोपीच्या संभाषणाचे अनेक रेकॉर्डींग पोलिसांकडे दिले आहेत. पण पोलिसांनी अजूनपर्यंत काहीच केलं नाही. पीडितेची आई म्हणाली की, पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. पण तरी पोलीस त्याला अटक करत नाहीये. स्थानिक लोकांनीही जबाब दिले की, तरूण सतत तरूणीच्या संपर्कात राहत होता. अलिकडे तो तिच्या घरीही येत होता.
पण याप्रकरणी औरंगाबाद पोलीस काहीतरी वेगळंच सांगत आहेत. जिल्हा एसपी कान्तेश कुमार मिश्रांनी सांगितलं की, आधी हे प्रकरण अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केलं होतं. नंतर कुटुंबियांनी एका तरूणाचं नाव घेतलं आणि तरूणीचं प्रेमप्रकरण समोर आलं. कुटुंबियांनी तरूणावर तरूणीला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप केला. याप्रकरणी एक टीम तयार केली आहे. घटनेची पूर्ण चौकशी केली जात आहे. जो दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.