मेट्रो स्टेशनच्या छतावरून तरूणीने खाली मारली उडी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:44 PM2022-04-14T12:44:38+5:302022-04-14T12:52:03+5:30
Girl Jump from Akshardham Metro Station Terrace: CISF च्या जवानांनी तरूणीला भिंतीवर उभं पाहिलं तेव्हा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. जवानांनी तरूणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
Girl Jump from Akshardham Metro Station Terrace: दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे ७ वाजून २८ मिनिटांनी सीआयएसएफच्या टीमने पाहिलं की, एक तरूणी मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला.
CISF च्या जवानांनी तरूणीला भिंतीवर उभं पाहिलं तेव्हा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. जवानांनी तरूणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने त्यांचं काही ऐकलं नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती.
CISF च्या जवानांनी तरूणीला बोलण्यात गुंतवूण ठेवलं आणि दुसरीकडे भिंतीखाली काही जवान एक चादर घेऊन उभे होते. जेणेकरून तरूणीने उडी मारली तर ते तिला वाचवू शकतील. तेवढ्यात जवानांनी लोकल पोलीस आणि अॅम्बुलन्सलाही फोन केला.
CISF जवानांनी एकीकडे तरूणीला समजावण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच तरूणीने खाली उडी मारली. सुदैवाने जवान खाली चादर घेऊन उभे होते. तेव्हा तरूणीला चादरीवर पकडण्यात आलं आणि त्यानंतर तिला लगेच लाल बहादुर शास्त्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तरूणीच्या पायावर जखम झाली. सध्या तरूणी ठीक आहे. आता लोकल पोलीस चौकशी करत आहे की, तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला?