'आजम फक्त माझा आहे' म्हणत प्रेयसीने मारली छतावरून उडी, मोडली तिची कंबर; तरूण गेला तुरूंगात....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:01 AM2022-04-26T11:01:39+5:302022-04-26T11:04:33+5:30
Uttar Pradesh : छतावरून उडी मारल्याने तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं.
यूपीच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareli) प्रियकर-प्रेयसीने घरातील लोकांवर नाराज होऊन असं पाउल उचललं जे त्यांनाच महागात पडलं. दोन्ही परिवार या लग्नाच्या विरोधात होते. ज्यामुळे प्रेयसी आणि प्रियकर रात्री उशीरा दोन मजली घराच्या छतावर खाली उडी मारण्यासाठी गेले. प्रेयसीच्या घरातील लोकांनी प्रियकराला धावत जाऊन पकडलं. पण प्रेयसीने 'आजम फक्त माझा आहे' असं म्हणत खाली उडी मारली.
छतावरून उडी मारल्याने तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं. बारादरी भागात राहणारी एक तरूणी गेल्या पाच वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या तरूणाच्या प्रेमात पडली होती.
सुरूवातीपासूनच दोघांच्याही नात्याला कुटुंबियांचं समर्थन नव्हतं. पण तरीही कुणाची पर्वा न करता दोघांचं प्रेम आणखी फुलत गेलं. जिद्दीला पेटलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचं नातं मोठ्या विरोधानंतर आणि वादांनंतर ठरलंही होतं. पण काही कारणाने हे नातं घरातील लोकांनी तोडलं.
तरीही दोघांनी एकमेकांना भेटणं सोडलं नाही. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. घरातील लोक या लग्नासाठी तयार होत नव्हते त्यामुळे दोघांनी ठरवलं की, दोघेही एकत्र आपलं जीवन संपवतील. दोघे एकमेकांना मिठी मारून तासंतास रडले. मग आत्महत्या करण्यासाठी दोन मजली छतावर चढले. कशाप्रकारे प्रेयसीच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले.
कुटुंबियांना येताना बघून तरूणी जोरात ओरडली आणि म्हणाली 'आजम केवळ माझा आहे'. यानंतर तिने छतावरून खाली उडी मारली. जसा प्रियकर उडी मारणार त्याला तरूणीच्या कुटुंबियांनी पकडलं. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. तेच तरूणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनुसार, तरूणीच्या कंबरेत फ्रॅक्चर आहे आणि आता ती कधीच योग्यप्रकारे चालू शकणार नाही.