अपहरण करून मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:53 PM2018-07-25T12:53:59+5:302018-07-25T12:55:15+5:30
अपहरण करुन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चिखली येथे घडली अाहे. याप्रकरणी अाराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
पिंपरी : एका पंधरा वर्षीय मुलीचे चार जणांनी अपहरण करुन विनयभंग केल्याची घटना समाेर अाली अाहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास चिखली येथे घडली.
सुमीत मोहोळे उर्फ आक्या बॉण्ड व इतर तीन अनोळखी मुले (रा. घरकुल चिखली) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने विनयभंगाची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी मुलगी घरी जात होती. त्यावेळी आरोपी आक्या बॉण्ड व त्याच्या साथीदारांनी त्या मुलीला जबरदस्तीने मोटारीत बसवून नेले. तसेच मोटारींमध्ये आक्या बॉण्ड याने तरुणीचा विनयभंग केला. फिर्यादी मुलगी व आरोपी आक्या यांची ओळख आहे. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.