दोन प्रियकरांसोबत मिळून प्रेयसीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या, नदीत फेकले होते त्याचे अवयव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 01:29 PM2022-08-01T13:29:53+5:302022-08-01T13:30:10+5:30

Crime News : एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी खुलासा करत सांगितलं की, 18 जुलैला मरंगामध्ये एका पुलाजवळ अनिल साह याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आणि दोन्ही हात कापले होते.

Girl killed her boyfriend help with other 2 boyfriend in purnia bihar | दोन प्रियकरांसोबत मिळून प्रेयसीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या, नदीत फेकले होते त्याचे अवयव

दोन प्रियकरांसोबत मिळून प्रेयसीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या, नदीत फेकले होते त्याचे अवयव

Next

Crime News : बिहारच्या(Bihar) पूर्णिया पोलिसांनी तिहेरी प्रेम प्रकरणातून झालेल्या एका हत्येचा खुलासा केला. अनिल साह याच्या हत्येची केस पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी सॉल्व केली. सोबतच हत्येनंतर 10 दिवसांच्या आत पोलिसांनी हत्याकांडातील आरोपींना अटक केली. पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रेयसी गंगा सोरेन, तिचा प्रियकर अंशुल आणि दुसरा प्रियकर अजमल यांना अटक केली.

एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी खुलासा करत सांगितलं की, 18 जुलैला मरंगामध्ये एका पुलाजवळ अनिल साह याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आणि दोन्ही हात कापले होते. पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलं की, ही प्रेम प्रकरणाची केस आहे. गंगा सोरेन हिचे अनिल साह, अंशुल आणि अजमल या तिघांसोबतही प्रेम संबंध होते. अंशुल आणि अजमल यांचा मृत अनिलसोबत वाद होत होता. याच कारणाने प्रेयसी गंगा सोरेन, अंशुल आणि अजमलने प्लान केला आणि प्रियकर अनिल साह याला बोलवलं.

यानंतर एका तलावाजवळ जाऊन अंशुल आणि अजमलने आधी अनिलचा गळा आवळला आणि मग धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला व हात कापले. यादरम्यान प्रेयसी गंगा सोरेने प्रियकर अनिलचे पाय पकडून होती. हत्येच्या या घटनेनंतर अनिलचे दोन्ही कापलेले हात कोसी नदीत फेकले होते. तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी फेकला. पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रेयसी गंगा सोरेन, अजमल आणि अंशुल यांना अटक केली. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेलं शस्त्र, बाइक आणि दोन मोबाइलही ताब्यात घेण्यात आलेत. पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Girl killed her boyfriend help with other 2 boyfriend in purnia bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.