मुलीसमोरच बॉयफ्रेन्डने केली आईची हत्या, मग मृतदेह सूटकेसमध्ये भरून....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:41 AM2021-08-24T11:41:39+5:302021-08-24T11:42:16+5:30
ही घटना आहे इंडोनेशियातील. जिथे २०१५ मध्ये एक तरूणी हीथर मॅक आणि तिच्या बॉयफ्रेन्ड टॉमी शेफरने ६२ वर्षीय शीला वॉन मॅकची हत्या केली होती.
एका तरूणीने आधी तर बॉयफ्रेन्डसोबत मिळून आपल्या आईची हत्या केली, नंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून टॅक्सीत टाकला. याप्रकरणी तरूणी आणि तिच्या बॉयफ्रेन्डला शिक्षा सुनावली गेली होती. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...
ही घटना आहे इंडोनेशियातील. जिथे २०१५ मध्ये एक तरूणी हीथर मॅक आणि तिच्या बॉयफ्रेन्ड टॉमी शेफरने ६२ वर्षीय शीला वॉन मॅकची हत्या केली होती. ही महिला हीथरची आई होती. या केसप्रकरणी हीथरला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर तिचा बॉयफ्रेन्ड टॉमीला १८ वर्षाची शिक्षा मिळाली.
रिपोर्टनुसार, हीथर आणि शेफरचा वॉन शीला वॉनसोबत बालीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर शेफरने ६२ वर्षीय महिलेल्या डोक्यावर फळांच्या वजनी टोपलीने वार केला होता. त्यानंतर मारून मारून तिची हत्या केली.
त्यानंतर दोघांनी शीला वॉनचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला आणि एका टॅक्सीमध्ये भरून घटनास्थळावरून फरार झाले. या हत्याकांडादरम्यान तरूणी हीथर मॅक गर्भवती होती. असा अंदाज आहे की, याच गोष्टीवरून तिची आई नाराज होती. अशात जेव्हा तिने मुलीच्या बॉयफ्रेन्डला हॉटेलमध्ये पाहिलं तर ती भडकली.
शेफरने कोर्टात हत्येची बाब कबूल केली. पण असाही दावा केला की, तो शीला वॉनसोबत वाद सुरू असताना स्वत:चा बचाव करत होता. त्याने हल्ला केला नव्हता. शेफर म्हणाला की, वॉन नाराज होती कारण तिची मुलगी गर्भवती होती.
कोर्टात सुनावणी दरम्यान वकिल म्हणाले की, जेव्हा हीथरची आईची हत्या केली जात होती, तेव्हा ती बाथरूममध्ये लपली होती. पण तिने हत्येनंतर मृतदेह सूटकेसमध्ये भरण्यास मदत केली. पण न्यायाधीशांनी तिलाही शिक्षा सुनावली.
आता हीथर २५ वर्षाची झाली आहे. तिला शिक्षा पूर्ण होण्याआधीच बालीच्या तुरूंगात सोडलं जाईल. तिचे वकिल म्हणाले की, तुरूंगात तिच्या चांगल्या व्यवहारामुळे तिची शिक्षा कमी केली जात आहे. तिची शिक्षा ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.