'संबंध ठेवले, मग सोडून गेला, तुम्ही त्याला सोडू नका', हे लिहून तरूणीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:51 AM2022-09-27T09:51:54+5:302022-09-27T09:52:34+5:30
Crime News : तरूणीने लिहिलं की, त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला सोडलं.
Crime News : लव्ह लाइफमध्ये ज्याच्यावर आपण जीव ओवाळतो अशा व्यक्तीकडून दगा मिळाल्यावर अनेकजण आपलं जीवन संपवतात. एका तरूणीनेही तेच केलं. तिने स्वत:ला संपवण्याआधी एक सुसाइड नोट लिहिली. यात तिने एका तरूणाचं नाव लिहिलं असून त्याने तिला दगा दिल्याचं सांगितलं. तरूणीने लिहिलं की, त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला सोडलं. ही घटना यूपीतील आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी तरूणाचा शोध घेतला जात आहे.
हरदोई जिल्ह्यातील एका गावात सोमवारी 18 वयाच्या एका तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरूणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना तरूणीने लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली. त्यात तिने आत्महत्येचं कारण लिहिलं होतं.
तरूणीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'माझ्या मृत्यूला प्रत्युष जबाबदार आहे. आधी त्याने माझ्यासोबत प्रेमाच नाटक केलं. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं त्याने मला सोडलं. तुम्ही लोक त्याला सोडू नका. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, पण मरू तर शकते'.
तरूणीच्या घरातील लोकांनी सांगितलं की, प्रत्युष त्यांच्याच गावात राहणारा आहे. तरूणी आणि त्याच्या अनेक महिन्यांपासून प्रेम सुरू होतं. आम्हाला नव्हतं माहीत की, मुलगी आत्महत्येसारखं पाउल उचलेल.
पोलिसांनी सांगितलं की, दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेम सुरू होतं, ती त्याला नेहमीच त्याच्यासोबत घेऊन जाण्यास सांगत होती. पण तो नेहमीच तिला नकार देत होता.
पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुसाइडही तपासली जात आहे. यातून जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची टीम पाठवली आहे.