धक्कादायक! युगुलाचे अश्लिल व्हिडीओ शूटिंग; व्हायरलची भीती दाखवून बलात्कार

By प्रदीप भाकरे | Published: April 16, 2023 08:42 PM2023-04-16T20:42:05+5:302023-04-16T20:42:52+5:30

खंडणीही उकळली, तिघांविरुद्ध गुन्हा, तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व तिनही आरोपी परस्परांच्या परिचयाचे आहेत. दरम्यान त्या मुलीची एका तरुणासोबत मैत्री आहे

Girl raped by shooting obscene video | धक्कादायक! युगुलाचे अश्लिल व्हिडीओ शूटिंग; व्हायरलची भीती दाखवून बलात्कार

धक्कादायक! युगुलाचे अश्लिल व्हिडीओ शूटिंग; व्हायरलची भीती दाखवून बलात्कार

googlenewsNext

अमरावती : एक अल्पवयीन मुलगी व तिच्या मित्राचा अश्लील व्हिडिओ काढून, तो व्हायरल करण्याची धमकी देत त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ११ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावालगतच्या शेतशिवारात ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मुख्य आरोपी राजा राऊत (रा. चांदूूर रेल्वे) याच्यासह संदीप चौधरी व धनंजय अशा तिघांविरुद्ध बलात्कार, विनयभंग, खंडणी व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. तीनही आरोपी पसार झाले आहेत.

तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व तिनही आरोपी परस्परांच्या परिचयाचे आहेत. दरम्यान त्या मुलीची एका तरुणासोबत मैत्री आहे, ते घरी सांगू, अशी भीती घालून तिनही आरोपी मुलगी व तिच्या मित्राला ऑटोत बसवून शिरजगाव कोरडे शिवारात घेऊन गेले. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेदरम्यान आरोपींनी मुलगी व तिच्या मित्राची अश्लील व्हिडीओ शूटिंग केली. ती शूटिंग व दोघांच्या मैत्रीची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी आरोपींनी त्या युगुलाला पैशाची मागणी केली. त्यामुळे घाबरून पीडिताच्या मित्राने आरोपींना दोन दिवसांनी दोन हजार रुपये नेऊन दिले. त्यानंतरदेखील राजा राऊत हा पीडितला त्रास देत होता.

दुचाकीवरून घेऊन गेला शिवारात
११ एप्रिल रोजी राजा राऊत व धनंजय नामक आरोपीने पीडिताच्या मित्राला पुन्हा दमदाटी केली. त्याचदिवशी राजा राऊत हा पीडिताला भीती दाखवून त्याच्या दुचाकीवर तालुक्यातील एका रस्त्यालगतच्या शिवारात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली. आरोपीने तिला शहरात सोडून दिले. तिने कसेबसे घर गाठले. मात्र, गुदरलेला प्रसंग सांगायचा तरी कसा, असा प्रश्न तिला पडला. अखेर १५ एप्रिल रोजी सायंकाळी तिने भावाजवळ मन मोकळे केले. त्याने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजा नामक आरोपीने अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तूर्तास तिन्ही आरोपी पसार झाले आहेत.- सुनील सोळंके, ठाणेदार, चांदूररेल्वे

Web Title: Girl raped by shooting obscene video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.