लोणीकंद येथे बापानेच केला मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 20:40 IST2018-10-06T20:39:05+5:302018-10-06T20:40:04+5:30
आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून एक जण बलात्कार करत असल्याची घटना लोणीकंद येथे उघडकीस आली आहे.

लोणीकंद येथे बापानेच केला मुलीवर बलात्कार
लोणीकंद : आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बाप गेल्या वर्षभरापासून बलात्कार करीत असल्याची घटना लोणीकंद येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी नराधम पित्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. वडगाव शिंदे येथे या मुलीचे कुटुंब हे मोलमजुरीसाठी वास्तव्यास आहे. नराधम बाप त्याच्या १३ वर्षांच्या मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून हे कृत्य करीत होता. वडगाव शिंदे येथील घरात व शेतात तसेच पिरगुट (ता. मावळ) येथे तिला मारण्याची धमकी देऊ त्याने हे गैरकृत्य केले. अखेर असह्य झाल्याने हा सर्व प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. यानंतर आईने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप माणकर यांच्या मार्गदर्शन खाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एल. साळुंखे पुढील तपास करीत आहेत.
०००