विवाहित महिलेने लग्नास दिला नकार, नाराज तरूणाने फेसबुकवर शेअर केले तिचे अश्लील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 03:16 PM2021-06-29T15:16:01+5:302021-06-29T15:18:20+5:30

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते.

Girl refused to marriage youth posted objectionable videos and pics on Facebook | विवाहित महिलेने लग्नास दिला नकार, नाराज तरूणाने फेसबुकवर शेअर केले तिचे अश्लील फोटो

विवाहित महिलेने लग्नास दिला नकार, नाराज तरूणाने फेसबुकवर शेअर केले तिचे अश्लील फोटो

googlenewsNext

यूपीच्या मथुरा जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आङे. इथे एका व्यक्तीने लग्नास नकार देणाऱ्या महिलेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, एक वर्षाआधी तिची ओळख मनवीर नावाच्या तरूणासोबत झाली होती. तरूणाला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. (हे पण वाचा : अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध)

पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर सांगितलं की, महिला तरूणाच्या जाळ्यात अडकली. दोन महिन्याआधी तरूण तिला आपल्या घरी घेऊन आला. महिला त्याच्या घरी तीन दिवस राहिली. यादरम्यान तरूणाने त्याच्या मोबाइलमध्ये महिलेचे काही प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काढले. (हे पण वाचा : लग्नाच्या नावावर तरूणीसोबत रेप, रात्रभर म्हणत राहिला - लग्न होणार, सकाळी मुंबईला झाला पसार...)

महिलेला काही दिवसांनी समजलं की, तरूण काहीच कामधंदा करत नाही. त्यामुळे महिलेचं मन बदललं आणि तिने लग्नास नकार दिला. अशात लग्नाच्या नकाराने भडकलेल्या तरूणाने  महिलेला बदनाम करण्यासाठी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले.

याप्रकरणी पोलीस अधिकारी राजित वर्मा म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जात असून रिपोर्टच्या आधारावर योग्य ती कारवाई केली जाईल.
 

Web Title: Girl refused to marriage youth posted objectionable videos and pics on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.