वर्गामध्ये अचानक एका पाठोपाठ एक ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:36 PM2023-02-01T16:36:19+5:302023-02-01T16:36:32+5:30

कोतवाली परिसरातील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये वर्गात शिकताना अचानक मुली बेशुद्ध पडू लागल्या.

Girl Students Fainted While Studying In King George Inter College Barabanki | वर्गामध्ये अचानक एका पाठोपाठ एक ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्काच बसला

वर्गामध्ये अचानक एका पाठोपाठ एक ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्काच बसला

googlenewsNext

बाराबंकी - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एका शाळेच्या ११ विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडल्या त्यातील ४ जणींची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्गात शिकताना एका पाठोपाठ एक मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर या मुलींना तातडीने लखनौच्या ट्रामा सेंटरला उपचारासाठी नेले. या शाळेच्या संरक्षक भिंतीशेजारी असलेल्या स्मशान भूमीत भंगारवाल्याकडून काही औषधे जाळण्यात आली. त्यामुळे विषारी वायू निर्माण झाला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये वर्गात शिकताना अचानक मुली बेशुद्ध पडू लागल्या. एका पाठोपाठ एक अशा ११ मुली बेशुद्ध झाल्या. काही शिक्षकही चक्कर येऊन कोसळले. या घटनेत जवळपास १५-२० लोकांची तब्येत बिघडली. या घटनेने खळबळ माजली. तात्काळ शाळा प्रशासनानं स्थानिक रुग्णालयात या सर्वांना उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित युवकाला अटक केली आहे. 

४ मुलींची तब्येत गंभीर 
घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस अधिकारी नवीन कुमार सिंह यांनी तात्काळ शाळा आणि आसपासचा परिसर सील केला. विद्यार्थ्यांची तब्येत ढासळत असल्याचं पाहताच त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्यानंतर ४ गंभीर विद्यार्थिंनीना लखनौच्या ट्रामा सेंटरला उपचारासाठी नेले. सध्या अफजा सिद्दीकी, नाजिया अंसारी, पलक, मानवी यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. तर खुशी गुप्ता, अंशिका तिवारी, इमरा, असलान अली, अंशिका वर्मा, मोहम्मद जमील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, अचानक दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने सुरुवातीला काहीच समजले नाही. त्यानंतर जेव्हा आम्ही याचा शोध घेतला तेव्हा भंगारवाल्याने काही औषधे जाळली होती. ज्यामुळे विषारी वायू निर्माण झाला. त्यामुळे अनेक बेशुद्ध पडले असं त्यांनी म्हटलं. तर शाळेत वर्गात शिकताना अचानक दुर्गंध आला. त्यामुळे आम्हाला श्वासही घेता येत नव्हता. उलटी आली. सर्व दहशतीचं वातावरण होतं. वर्गात गोंधळ उडाला होता असं पीडित विद्यार्थिनीने सांगितले. 

Web Title: Girl Students Fainted While Studying In King George Inter College Barabanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.