'त्या' मेलेल्या मुलाला जिवंत करा! ग्रामस्थांनी चेटकिण समजून दोघींना बेदम मारले; कपडे फाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 02:36 PM2021-05-26T14:36:51+5:302021-05-26T14:37:05+5:30

ग्रामस्थांकडून दोन मुलींना जबर मारहाण; गयावया करूनही सुटका नाही; मांत्रिकाच्या सल्ल्यामुळे घडला प्रकार

Girl Students Were Beaten By Villagers Stubborn Trying To Bring The Dead Child Alive As A Witch In Jamui District | 'त्या' मेलेल्या मुलाला जिवंत करा! ग्रामस्थांनी चेटकिण समजून दोघींना बेदम मारले; कपडे फाडले

'त्या' मेलेल्या मुलाला जिवंत करा! ग्रामस्थांनी चेटकिण समजून दोघींना बेदम मारले; कपडे फाडले

Next

जमुई: आपण २१ व्या शतकात, विज्ञान युगात राहतो. मात्र आजही काही भागांमध्ये अंधश्रद्धा अतिशय खोलवर रुजल्या आहेत. लोकांच्या मनावर अंधश्रद्धेचा पगडा असल्यानं त्यांच्या हातून सर्रास गुन्हे घडतात. बिहारच्या जमुईमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चेटकिणी असल्याचं समजून दोन मुलींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना सिमुलतला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

गादी टेलवा गावात वास्तव्यास असलेल्या राकेश साह नावाच्या व्यक्तीच्या पाच महिन्यांचा मुलाचा मृत्यू झाला. मुलाचं अचानक निधन झाल्यानं त्याचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन एका मांत्रिकाकडे गेले. या मुलाची हत्या चेटकिणीनं केल्याचं त्यानं मांत्रिकानं सांगितलं. मुलाचा मृतदेह गावाबाहेर असलेल्या नदीच्या पात्रात असलेल्या वाळूत पुरून ठेवा. मग ज्या चेटकिणीनं त्याचा जीव घेतला ती त्याला जेवण भरवण्यासाठी नक्की येईल, अशी सूचना मांत्रिकानं केली.

जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकार

मांत्रिकेच्या सूचनेनुसार ग्रामस्थांनी लहान मुलाचा मृतदेह वाळून पुरला आणि काही अंतरावर दबा धरून बसले. रात्री १२ च्या सुमारास त्यांना तिथे दोन मुली दिसल्या. त्यांना ग्रामस्थांनी पकडलं आणि गावात आणलं. वाळूत पुरण्यात आलेल्या मुलालादेखील त्याच्या कुटुंबियांनी गावात आणलं आणि त्या दोन मुलींना त्याला जिवंत करण्यास सांगितलं. आम्ही शेजारच्या गावच्या रहिवासी आहोत. आम्हाला सोडा, अशी विनवणी दोघींनी केली. मात्र ग्रामस्थांनी त्यांचं ऐकलं नाही.

मांत्रिकावर विश्वास असलेल्या ग्रामस्थांनी मुलींचे कपडे फाडले, त्यांचे केस कापले. त्यानंतर हातात मिळेल त्या वस्तूनं त्यांना जबर मारहाण केली. आम्हाला मुलाच्या मृत्यूबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही केवळ शौच करण्यासाठी नदी किनारी आलो होतो, असं सांगत मुलींनी ग्रामस्थांकडे दयेची भीक मागितली. मात्र तरीही ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच झाझा सर्कलचे निरीक्षक सुशील कुमार सिंह यांनी एक पथक गादी टेलवा गावात पाठवलं. मात्र ग्रामस्थांनी त्यांना पळवून लावलं. यानंतर एसएसबीच्या जवानांचं पथक गावात पाठवण्यात आलं. या पथकानं मुलींची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली.

Web Title: Girl Students Were Beaten By Villagers Stubborn Trying To Bring The Dead Child Alive As A Witch In Jamui District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.