खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 01:35 PM2020-06-10T13:35:25+5:302020-06-10T13:52:19+5:30

 ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे.

A girl was abducted and raped by a revenue officer with two others | खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

Next
ठळक मुद्देया जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सुशील पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात भा. दं. वि. कलम 376बी, 323, 504, 364 आणि एससीएसटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बांदा (उत्तर प्रदेश) - एका 18 वर्षीय मुलीला चालत्या कारमधून महसूल कर्मचारी व इतर दोघांनी अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांकडे पीडित महिलेने मंगळवारी केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेखपाल नरैनी कोतवालीतील पोलिस स्टेशन अंतर्गत पुंगरी गावात तैनात होता. कोतवाली येथे पीडित मुलीने सोमवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक गिरिंद्र सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास 18 वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली होती, परंतु त्यानंतर दोन दिवसांनी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी मुलगी दारात कचरा साफ करत होती, पुखरी गावात तैनात लेखपाल (महसूल कामगार) सुशील पटेल, दोन साथीदारांसह त्याच्या जीपमधून आला आणि मुलीला जबरदस्तीने जीपमध्ये टाकून नेले. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला ढकलून देऊन खाली खाली पाडण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीडित मुलीने तिच्या तक्रारीत लेखपालाने तिच्यावर चालत्या जीपमध्ये बलात्कार केला आणि हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर जीप थांबली तेव्हा तिने जीपमधून उडी मारुन पळ काढला." पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सुशील पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात भा. दं. वि. कलम 376बी, 323, 504, 364 आणि एससीएसटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

 

खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

 

गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही 

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्स अ‍ॅपवरून मुली पुरवायचे; म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

Web Title: A girl was abducted and raped by a revenue officer with two others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.