मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 09:40 PM2021-09-01T21:40:57+5:302021-09-01T21:41:53+5:30

Rape Case : ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती.

A girl who came to Delhi with a friend was raped by a rickshaw driver; Arrested from Bihar | मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पीडित मुलगी मित्रासह बिहारहून आली होती.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली बिहारमधून ३२ वर्षीय रिक्षाचालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर मुलीला आमिष दाखवून घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याशिवाय आरोपीवरही चोरीचा देखील आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.

ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती. असा आरोप आहे की, ऑटो चालकाने पीडितेला फूस लावून त्याच्या घरी नेले आणि त्याने बलात्काराची घटना घडवली. आरोपीने मुलीला नोकरीचे आश्वासन दिले होते. पीडितेने पोलिसात तक्रार दिली ज्यात तिने सांगितले की तिच्यावर फक्त बलात्कारच झाला नाही तर आरोपीच्या साथीदारानेही लुटमार देखील केली आहे.

गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पीडित मुलगी मित्रासह बिहारहून आली होती. मग त्याने ऑटो चालकाशी बातचीत झाली. यानंतर आरोपीने मुलीला आपल्या वासनेला बळी बनवले. पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. या घटनेनंतर तो त्याच्या गावी गेला होता आणि लपून बसला होता, त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत त्याच्या गावात पोहोचले आणि त्याला अटक करण्यात आली.

Web Title: A girl who came to Delhi with a friend was raped by a rickshaw driver; Arrested from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.