प्रेमात पडलेल्या मुलीला घरच्यांनीच जाळले, उत्तर प्रदेशातील प्रकार, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 01:57 AM2021-02-16T01:57:42+5:302021-02-16T01:57:57+5:30
Crime News : तरुणीला मारण्यासाठी वडील व भावानेच दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
गोरखपूर : अन्य धर्मीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या सुपारी देऊन जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुलीचे वडील, भाऊ आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. त्या तिघांनी तरुणीला सुपारी देऊन जाळल्याचेही स्पष्ट झाले आहे.
ज्याने त्या तरुणीला प्रत्यक्ष जाळले, त्या वरुण तिवारी नावाच्या इसमाचा शोध पोलीस घेत आहेत. तिला मारण्यासाठी वडील व भावानेच दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. तिला ज्या ठिकाणी जाळण्यात आले, तेथून पेट्रोलचा डबा आणि दुचाकी ताब्यात घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
ही तरुणी अन्य धर्मांच्या तरुणाच्या प्रेमात होती. तिने त्याच्याशी विवाह केला, तर आपली समाजात मानहानी होईल, असे तिच्या कुटुंबीयांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी तिला मारून टाकले, असे पोलिसांनी सांगितले. मुलीचे वडील कैलाश यादव, भाऊ अजित व दोघांनाही अटक झाली आहे. (वृत्तसंस्था)