आश्रयास असलेल्या मुलीनेच केले फुलविक्रेत्या मुलीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 05:18 PM2022-01-04T17:18:39+5:302022-01-04T17:19:34+5:30

kidnapping Case : याप्रकरणी मुलीच्या आईने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

The girl who was sheltered was abducted of a florist girl | आश्रयास असलेल्या मुलीनेच केले फुलविक्रेत्या मुलीचे अपहरण

आश्रयास असलेल्या मुलीनेच केले फुलविक्रेत्या मुलीचे अपहरण

Next

ठाणे  : फुलविक्रेत्याच्या घरात आश्रय घेतलेल्या ज्योती (२०) हीनेच फुलविक्रेत्याच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची गंभीर बाब नौपाडा पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे.  मुलीने दाखिवलेल्या चातुर्याने आणि नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने तिची सुटका झाली आहे. नौपाडा पोलिसांनी या मुलीला दिल्लीहून विमानाने ठाण्यात आणले. परंतु आता ज्योतीचा शोध मात्र सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलीसांनी दिली. मुलीची विक्री करण्यासाठीच तिचे अपहरण झाले असावे अशी शक्यता वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी वर्तविली आहे.


बेपत्ता झालेली १३ वर्षीय मुलगी ही तिचे आई- वडील आणि तीन भावंडांसोबत कळवा येथील भास्करनगर भागात राहते. तिच्या आई- वडिलांचा ठाणो रेल्वे स्थानक परिसरात फुलविक्रीचा व्यवसाय आहे. सध्या शाळा बंद असल्याने ही मुलगीही तिच्या आई-वडिलांना फुलविक्रीच्या व्यवसायामध्ये मदत करत होती. २९ डिसेंबर २०२१ ला ती फुलविक्री करत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या आई वडीलांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्न, ती परिसरात आढळून आली नाही.

याप्रकरणी मुलीच्या आईने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा प्रकार नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  याप्रकरणाचा तपास सुरू केला. पथकाने  मुलीच्या आई- वडिलांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या घरी दोन ते तीन दिवसांपूर्वी  दिल्लीहून आलेली ज्योती ही आश्रयास होती. मुलगी आणि ज्योतीही एकाच दिवशी गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यानुसार तपास सुरु केला.


ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच हमालांची चौकशी केली. त्यावेळी एक लहान आणि मोठी मुलगी फलाटावर दिसल्याचे त्या हमालाने पोलिसांना सांगितले. त्या दिवशी दिल्लीला गेलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती पोलिसांनी मिळविली. तसेच दिल्ली पोलिसांनाही या घटनेची माहिती तात्काळ दिली.  


१ जानेवारीला अचानक मुलीच्या वडिलांच्या मोबाईल क्र मांकावर दिल्लीतील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून फोन आला. त्या व्यक्तीने तुमची मुलगी दिल्ली येथील द्वारका भागात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तो व्यक्ती तिला तात्काळ दिल्ली येथील द्वारका पोलीस ठाण्यात घेऊन गेला. मुलीच्या वडिलांनीही याची माहिती नौपाडा पोलिसांना दिली. मुलीच्या आई-वडिलांची ओळख पटविण्यासाठी द्वारका पोलीस ठाण्याच्या अधिका:यांनी नौपाडा पोलिसांना व्हिडीओ कॉल केला. मुलीने हेच आपले आई-वडिल असल्याचे सांगितल्यानंतर द्वारका पोलिसांनी तिचा ताबा घेतला. संजय धुमाळ यांनी तात्काळ तीन अधिकाऱ्यांना विमानाने ठाण्याहून दिल्लीला पाठविले. पोलिसांनी मुलीचा ताबा घेतल्यानंतर ज्योतीसोबत ती  कोणत्या हॉटेल तसेच ठिकाणी वास्तव्यास होती. याची माहिती घेतली. मात्न, ज्योती पोलिसांना आढळून आली नाही. मंगळवारी पोलिसांनी या मुलीला विमानाने पुन्हा ठाण्यात आणले. त्यानंतर आता फरार असलेल्या ज्योतीचा तपास नौपाडा पोलीसांनी सुरु केला आहे.

Web Title: The girl who was sheltered was abducted of a florist girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.