मॉर्निंग वॉकसाठी निघालेली मुलगी घरी परतली नाही, अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:06 PM2022-01-17T21:06:28+5:302022-01-17T21:07:27+5:30
Kidnap And Gangrape Case : हे प्रकरण चान्हों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन तरुणींचा कारमधील तीन तरुणांनी पाठलाग केला.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे कारमध्ये अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
हे प्रकरण चान्हों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन तरुणींचा कारमधील तीन तरुणांनी पाठलाग केला. त्यातील एका मुलीला गाडीत बसवल्यानंतर निर्जन ठिकाणी नेले. जिथे तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुली मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाल्या होत्या. त्यानंतर त्या मुलींच्या मागे एक कार आली. या कारमध्ये तीन तरुण होते. या तिघांनी आधी मुलींचा खूप पाठलाग केला, नंतर एका मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून एका निर्जन ठिकाणी नेले.
तिन्ही तरुणांनी मुलीवर आलटून-पालटून बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. कसा तरी त्या मुलांच्या तावडीतून सुटलेल्या पीडितेने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रांचीमधील सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे भाजपने या प्रकरणी झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याचा बोजवारा उडाला आहे. कधी डायन बिसाहीच्या नावाखाली तर कधी इतर कोणत्याही घटनेत मॉब लिंचिंगच्या घटनाही घडताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपुष्टात आला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.