धक्कादायक! लग्नासाठी मागे लागली होती प्रेयसी, प्रियकराने दिलं नदीत ढकलून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:31 PM2021-08-03T15:31:31+5:302021-08-03T15:34:22+5:30
आंध्र प्रदेश पोलीस तरूणीच्या शोधात सहारनपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी घटनेचा खुलासा केला.
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खाताखेडी येथे राहणारा तरूण विजयवाडा आंध्र प्रदेशातील तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून सहारनपूरमध्ये घेऊन आला. तरूणीने लग्नाचा तगादा लावला तर तो तिला फिरण्यासाठी म्हणून यमुना नदीवर घेऊन गेला आणि तिला नदीत ढकलून दिलं. अशात आंध्र प्रदेश पोलीस तरूणीच्या शोधात सहारनपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी घटनेचा खुलासा केला.
आंध्र प्रदेश आणि मंडीच्या पोलिसांनी मिळून तरूणीचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन केलं. मात्र, मृतदेह काही सापडला नाही. पोलिसांनी आरोपीकडून तरूणीचं दहा तोळे सोनं ताब्यात घेतलं. खाताखेडी येथे राहणारा आसिफ हा विवाहित आहे. काही दिवसांपूर्वी त्याची ओळख विजयवाडा येथील २४ वर्षीय तस्लीमा सोबत झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि ते फोनवर बोलू लागले होते. (हे पण वाचा : Shocking! डॉक्टरने स्पर्म बदलून शेकडो महिलांना केलं प्रेग्नेन्ट, असा झाला खुलासा....)
काही दिवसांपूर्वी आसिफ एका मित्रासोबत तस्लीमाला दिल्लीत भेटला आणि तिला कारमध्ये बसवून सहारनपूरला आणलं. वेगवेगळ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन त्याने तिला ठेवलं. तरूणी तिच्यासोबत १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन आली होती. तिकचे तरूणीच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. कॉल डीटेल्सच्या आधारावर आंध्र प्रदेश पोलीस सोमवारी सकाळी सहारनपूरच्या कोतवाली मंडीला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आसिफ आणि त्याच्या मित्राला अटक केली. चौकशीत आसिफने तस्लीमाला नदीत धक्का दिल्याचं मान्य केलं. (हे पण वाचा : अंडरगारमेंट्समधून ड्रग्स घेऊन जात होती १९ वर्षीय डीलर, पोलिसांनी पकडलं तेव्हा झाले हैराण)
पोलीस चौकशी आरोपींनी सांगितलं की, तस्लीमा आसिफसोबत लग्नासाठी तगादा लावत होती. पण तो आधीच विवाहित होता. त्याने तस्लीमाला सांगितलं की, तो आधी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार आणि मग तिच्यासोबत लग्न करणार. यानंतर आसिफने मित्रासोबत मिळून तस्लीमापासून पिच्छा सोडवण्यासाठी प्लॅन केला. आसिफ आणि तैय्यब तरूणीला फिरायला घेऊन गेले. तिथे त्यांनी तरूणीसोबत फोटो काढले. त्यानंतर तिघेही घरी परत आले.
१८ जुलैला पुन्हा त्याच ठिकाणी ते फिरायला गेले. इथे आसिफने तिला यमुना नदीत ढकललं. अजूनही तरूणीचा मृतदेह सापडलेला नाही. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच तरूणीच्या मृतदेहाचाही शोध घेतला जात आहे.