ब्रेकअप न करणाऱ्या बॉयफ्रेंडचं गर्लफ्रेंडने अपहरण केले; त्यानंतर जे घडले त्याने पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 03:40 PM2023-04-14T15:40:01+5:302023-04-14T15:40:29+5:30

प्रेयसीने शिवरामचं न ऐकता त्याच्यापासून दूर झाली. त्यानंतर ती नव्या प्रियकरासोबत राहू लागली

Girlfriend kidnaps boyfriend who didn't break up; she beat boyfriend in ernakulam | ब्रेकअप न करणाऱ्या बॉयफ्रेंडचं गर्लफ्रेंडने अपहरण केले; त्यानंतर जे घडले त्याने पोलीस हादरले

ब्रेकअप न करणाऱ्या बॉयफ्रेंडचं गर्लफ्रेंडने अपहरण केले; त्यानंतर जे घडले त्याने पोलीस हादरले

googlenewsNext

एर्नाकुलम - केरळच्या एर्नाकुलम इथं हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी प्रेयसीनं तिच्या प्रियकराचे अपहरण केले. त्यानंतर त्याला बेदम मारले. एवढ्यावरच मन भरले नाही म्हणून प्रियकराला नग्न करून त्याचा व्हिडिओ बनवला आणि विना कपडे त्याला रस्त्यावर फेकले. जर ही गोष्ट बाहेर सांगितली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही प्रेयसीने दिली. 

पीडित प्रियकराने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली आहे. या कामात प्रेयसीला मदत करणाऱ्या अन्य ७ जणांनाही अटक करण्यात आली आहे. एर्नाकुलमच्या वर्कला इथं राहणाऱ्या १९ वर्षीय लक्ष्मीप्रियाचे शिवराम नावाच्या युवकाशी अफेअर सुरू होते. त्याचवेळी लक्ष्मीप्रियाची भेट अन्य एका युवकाशी झाली. दोघांमध्ये मैत्री होऊन प्रेमात पडले. याची माहिती शिवरामला झाली. त्याने प्रेयसीला समजवण्याचा प्रयत्न केला. 

प्रेयसीने शिवरामचं न ऐकता त्याच्यापासून दूर झाली. त्यानंतर ती नव्या प्रियकरासोबत राहू लागली. तरीही शिवरामने तिचा पाठलाग सोडला नाही. ही बाब प्रेयसीच्या तिच्या नव्या प्रियकराला सांगितली. तेव्हा दोघांनी मिळून शिवरामला धडा शिकवण्याचा कट रचला. प्रेयसीने काही रुपये देऊन लोक भाड्याने घेतली. शिवरामला व्हॉट्सअपला मेसेज केला. लक्ष्मीप्रियाने लोकेशन पाठवून त्याला भेटायला बोलावले. त्याठिकाणी नव्या प्रियकरासह इतर ६ जण वाट पाहत होते. शिवराम तिथे पोहचताच त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. 

दारू-गांजा पाजला, निर्वस्त्र केले अन्...
अपहरणानंतर प्रेयसीने नवीन प्रियकर आणि साथीदारांसह शिवरामला जबरदस्ती दारू पाजली, गांजा दिला. त्यानंतर बेदम मारले. इतकेच नाही तर शिवरामला निर्वस्त्र करून त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याच अवस्थेत त्याला वायटिला रोडवर सोडून दिले. जर कुणालाही या घटनेबाबत सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी शिवरामला दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार शिवरामने पोलिसांना सांगितला. तात्काळ पोलिसांनी दखल घेत लक्ष्मीप्रियासह ६ जणांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

Web Title: Girlfriend kidnaps boyfriend who didn't break up; she beat boyfriend in ernakulam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.