प्रेमाचा खूनी खेळ! Ex Boyfriend नं घरी बोलावून चाकूने केले ७ वार; रक्तबंबाळ अवस्थेत गर्लफ्रेंड...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:52 AM2021-10-20T07:52:16+5:302021-10-20T07:55:37+5:30
हा धक्कादायक प्रकार दिल्लीच्या द्वारका जिल्ह्यात घडला. ज्याठिकाणी युवतीच्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला भेटण्यासाठी बोलावलं.
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत एका युवतीच्या हत्येने धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स बॉयफ्रेंडने युवतीला भेटण्यासाठी घरी बोलावलं आणि त्यानंतर चाकूने तिच्यावर वार करुन हत्या केली. युवतीचा मृतदेह पाहून सगळ्यांचा अंगाचा थरकाप उडेल इतक्या भयानकपणे तिची क्रूर हत्या करण्यात आली आहे. आरोपी हा युवतीच्या शेजारी राहायला होता. विशेष म्हणजे या प्रकरणात कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. आता पोलिसांनी स्वत: याची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.
हा धक्कादायक प्रकार दिल्लीच्या द्वारका जिल्ह्यात घडला. ज्याठिकाणी युवतीच्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला भेटण्यासाठी बोलावलं. जेव्हा ही युवती तिथे पोहचली तेव्हा दोघांमध्ये वाद रंगला आणि त्याचवेळी आरोपी युवकानं युवतीवर चाकूने वार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी युवक हा युवतीच्या शेजारीच राहायला होता. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. युवतीच्या हत्येची माहिती पोलिसांना हॉस्पिटलकडून कळाली. तोपर्यंत कुणीही या घटनेची पोलीस तक्रार केली नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलीस तपासात आरोपीची ओळख अंकित गाबा असल्याचं निष्पन्न झालं. घटनास्थळी आरोपीसोबत हिमांशू आणि मनीष नावाची आणखी दोन मुलं होती. तर मृत युवती २४ वर्षीय डॉली आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेली युवती स्वत: हॉस्पिटलला चालत गेली परंतु तिचा जीव वाचू शकला नाही. अत्यंत गंभीर अवस्थेत युवती जेव्हा हॉस्पिटलला पोहचली तेव्हा हॉस्पिटलने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणात कुठेही पीसीआर कॉल अथवा तक्रार दाखल झाली नाही.
हॉस्पिटलने सांगितल्याप्रमाणे, युवतीच्या शरीरावर चाकूने ७ वार करण्यात आले होते. ज्यात तिला गंभीर जखमा झाल्या होत्या. पोलीस या प्रकरणातील आरोपी अंकित गाबा आणि त्याचे दोन साथीदार यांचा शोध घेत आहेत. सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत. मुलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखेर ही हत्या कुठल्या कारणामुळे करण्यात आली? हत्येमागचा हेतू काय? हत्या करून गुन्हेगार कुठे फरार झाले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. आरोपीच्या घरी पोलिसांनी धाड टाकून तपासाला सुरुवात केली आहे.