पत्नीचं आधार कार्ड वापरुन गर्लफ्रेंडला नेलं हॉटेलमध्ये; बिझनेसमनचा मृत्यू होताच पळाली 'ती' अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:21 IST2025-01-22T12:19:43+5:302025-01-22T12:21:43+5:30

एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असलेले राजस्थानमधील बिझनेसमन निलेश भंडारी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

girlfriend to hotel on wifes aadhar card lucknow police is searching for female friend | पत्नीचं आधार कार्ड वापरुन गर्लफ्रेंडला नेलं हॉटेलमध्ये; बिझनेसमनचा मृत्यू होताच पळाली 'ती' अन्...

पत्नीचं आधार कार्ड वापरुन गर्लफ्रेंडला नेलं हॉटेलमध्ये; बिझनेसमनचा मृत्यू होताच पळाली 'ती' अन्...

लखनौमधील एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असलेले राजस्थानमधील बिझनेसमन निलेश भंडारी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. निलेश यांचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर निलेश यांची गर्लफ्रेंड घटनास्थळावरून पळून गेली. पोलीस तिचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. निलेश यांच्या पत्नीच्या आधार कार्डवर ती हॉटेलमध्ये राहत असल्याचं सांगण्यात येत आहे.

लखनौच्या चिनहट येथील एका हॉटेलच्या रूम नंबर २०८ मध्ये ही घटना घडली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी २० जानेवारी रोजी पोलिसांना एका गेस्टचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हॉटेल गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याच वेळी, पोलिसांना घटनास्थळी पाहून, बिझनेसमनसोबत हॉटेलमध्ये राहणारी महिला पळून गेली. सध्या पोलिसांनी हॉटेलच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे आणि फुटेज तपासत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिझनेसमन निलेश भंडारी हे मूळचे राजस्थानमधील जालोर येथील रहिवासी होते. त्यांचा बंगळुरू आणि सूरतमध्ये व्यवसाय होता. ते एका मीटिंगच्या निमित्ताने लखनौला आले होते. तेव्हा त्यांची गर्लफ्रेंड दोन दिवस हॉटेलमध्ये राहिली होती. याच दरम्यान, सोमवारी रात्री निलेश यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळाली की, निलेश बाथरूममध्ये आंघोळ करत असताना खाली पडले, त्यानंतर बेशुद्ध झाले आणि जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. निलेश यांनी त्यांच्या पत्नीच्या आधार कार्डचा वापर करून आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. तपासादरम्यान पोलिसांना पत्नीचं आधार कार्ड सापडलं.

प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, निलेश यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की, निलेश यांच्यासोबत नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: girlfriend to hotel on wifes aadhar card lucknow police is searching for female friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.