चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 09:24 PM2022-03-20T21:24:34+5:302022-03-20T21:25:03+5:30

Murder Case : बागेत पिंपळाच्या झाडाखाली दोन वर्षांच्या चिमुरडीचे छिन्नविछिन्न शिर पडलेले आढळून आले. पोलिसांना धड सापडलेले नाही.

Girl's head was found and he started searching for other parts of the body | चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु

चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील बकेवार पोलीस स्टेशनमध्ये एका 2 वर्षीय मुलीचे शिर आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. ही घटना बकेवार शहराजवळील कांशीराम कॉलनीजवळील राजेश नारायण यांच्या बागेतील आहे. बागेत पिंपळाच्या झाडाखाली दोन वर्षांच्या चिमुरडीचे छिन्नविछिन्न शिर पडलेले आढळून आले. पोलिसांना धड सापडलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश नारायण हे आपली जनावरे बांधण्यासाठी बागेत पोहोचताच पिंपळाच्या झाडाखाली तुकडे झालेले शिर पाहून ते घाबरले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस आले आणि त्यांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी ओळख न दिल्याने फॉरेन्सिक टीम तपासातील पुरावे गोळा करत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात गुंतले आहेत. शिरशिवाय धडाचाही शोध घेतला जात आहे. प्रथमदर्शनी शिर धारदार शस्त्राने कापण्यात आले आहे. त्यामुळे बळी दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर वगळता शरीराचे अवयव सापडले नाहीत, तपास सुरू आहे

वरिष्ठ पोलिस अधीक्षक जयप्रकाश सिंह यांनी सांगितले की, पोलिस स्टेशन बकेवार परिसरातून एका मुलीचे छिन्नविछिन्न शिर सापडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी दोन वर्षांच्या मुलीचे शिर आढळून आले. शरीराचे इतर अवयव सापडले नाहीत. ओळख पटवली जात आहे. स्थानिक लोकांशी ओळख होऊ शकत नाही. ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. प्रकरण काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल.

 

Web Title: Girl's head was found and he started searching for other parts of the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.