सांगवीत अॅसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:37 PM2019-07-18T13:37:13+5:302019-07-18T13:37:47+5:30
माझ्याजवळ अॅसिडची बाटली आहे. तू माझ्या घरी चल नाहीतर अॅसिड टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली.
पिंपरी : अॅसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला. तसेच फोन नंबर देण्यास नकार दिल्याने काठीने पायावर व हातावर मारून जखमी केले. जुनी सांगवी येथे सोमवारी (दि. १५) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस कमलाकर गायकवाड (वय २५, रा. जुनी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपी तेजस गायकवाड याने पीडित तरुणीस फोन नंबर मागितला. तसेच माज्या घरी चल, असे म्हणाला. त्यास तरुणीने नकार दिला. माझ्याजवळ अॅसिडची बाटली आहे. तू माझ्या घरी चल नाहीतर अॅसिड टाकीन, अशी धमकी आरोपी तेजस गायकवाड याने दिली. त्यानंतर तरुणीस घरी घेऊन जाऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तरुणीचा विनयभंग केला. तसेच आरोपी गायकवाड याने तरुणीकडे फोन नंबर मागितला. त्यास तरुणीने नकार दिला. त्यामुळे आरोपी तेजसने तरुणीला काठीने पायावर व हातावर मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.