५० टक्के द्या... म्हणत कंत्राटदाराला धमकी; भाजप नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 01:48 PM2021-12-16T13:48:41+5:302021-12-16T13:49:14+5:30

Crime News : नवघर पोलिसांनी केणी यांच्या मुलासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Give 50 percent saying threat to the contractor Crime against BJP corporators son | ५० टक्के द्या... म्हणत कंत्राटदाराला धमकी; भाजप नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा

५० टक्के द्या... म्हणत कंत्राटदाराला धमकी; भाजप नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा

Next

मनीषा म्हात्रे


मुंबई : टेंडर मागे घ्या नाही तर ५० टक्के द्या म्हणत,  सिव्हिल कंत्राटदाराला भाजप नगरसेविका रजनी केणी यांच्या कार्यालयात डांबून त्यांच्या मुलाकडून दमदाटी करत धमकावल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी केणी यांच्या मुलासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

म्हाडा परिसरात राहणारे तक्रारदार संकेत हिर्लेकर (३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पालिकेच्या ऑनलाइन ई-टेंडरव्दारे वॉर्ड क्रमांक १०५ मधील दोन कामे मिळाली. काम मिळाल्यानंतर ४ डिसेंबर रोजी काॅन्ट्रॅक्टर मनोज जाधवने कॉल करून टेंडर मागे घेण्यास सांगितले.  

त्यापाठोपाठ केणी यांचा मुलगा नमित केणी याने कॉल  करून भेटण्यास बोलावले. त्यानुसार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केणी यांच्या कार्यालयात गेल्यानंतर रजनी केणी यांची भेट झाली. त्यांना अमितच्या कॉलबाबत सांगताच, नमित मुलगा असून,  तोच सर्व सिव्हिल काॅन्ट्रॅक्टर काम पहात असल्याचे सांगून त्यांनाच भेटण्यास सांगितले.

काही वेळाने तेथे आलेल्या नमित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना मिळालेले काम आधीच पूर्ण केले असल्याचा दावा केला.  टेंडर मागे घेत असल्याबाबत लेटर तयार करून सही करण्यास सांगितले. नकार देताच, बनावट सही करून जबरदस्ती कारमध्ये बसवून टी वाॅर्ड कार्यालयात नेत अर्ज देण्यास भाग पाडले. 

एकाने केली बनावट स्वाक्षरी
अर्जावर सही करण्यास नकार देताच,  त्यातील एकाने बनावट सही केली. त्यानंतर टेंडरची ५० टक्के रक्कम द्या नाही तर काम सोडा असे सांगितले. 

नगरसेविका म्हणे, मला काहीच माहिती नाही
याबाबत नगरसेविका रजनी केणी यांच्याकडे विचारणा करताच आपल्याला काहीही माहिती नसून आपण मुलाच्या लग्नात व्यस्त असल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल झाला आहे हेदेखील आताच समजल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एकाला अटक : याप्रकरणी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्याला दुजोरा देत मनोज जाधवला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी सांगितले आहे.

Web Title: Give 50 percent saying threat to the contractor Crime against BJP corporators son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.