'2 लाखांची बाईक द्या, मुलगा परत घ्या'... पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:43 PM2022-06-21T20:43:11+5:302022-06-21T20:43:35+5:30
Kidnapping Case : दोघेही आंध्र प्रदेशातील एका दागिन्यांच्या दुकानात एकत्र काम करतात.
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातून धक्कादायक अपहरणाची घटना समोर आली आहे, ज्यात पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीला पकडले आहे. हे प्रकरण दानकुणी भागातील आहे. येथे शेख बबई नावाच्या तरुणाची खानाकुल येथील राहुल सामंतो याच्याशी मैत्री होती. दोघेही आंध्र प्रदेशातील एका दागिन्यांच्या दुकानात एकत्र काम करतात.
दोघेही रजेवर पश्चिम बंगालला आले असता राहुलने त्या तरुणाला प्रवासाच्या बहाण्याने हावडा येथे बोलावले. शेख बबईला यायला तयार केले. मात्र हावडा येथे पोहोचल्यावर राहुल आणि त्याचे साथीदार गाडी घेऊन तेथे पोहोचले. कपाळावर बंदूक ठेवून बबईचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी बबईच्या वडिलांना फोन करून एक लाख रोख आणि दोन लाख रुपये किमतीची दुचाकी मागितली.
साध्या गणवेशात पोलीस आले
खंडणीचे पैसे घेऊन बबईचे वडील अपहरणकर्त्यांच्या अड्ड्यापर्यंत पोहोचले. मात्र, त्याआधीच त्याने पोलिसात तक्रार दिली होती, त्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा कट रचला. त्यांनी सर्वप्रथम फिल्मी स्टाइलमध्ये अपहरणकर्त्यांच्या अड्ड्यांना वेढा घातला. अपहरणकर्त्यांना संशय येऊ नये म्हणून पोलिस साध्या गणवेशात तेथे पोहोचले होते.
मुख्य आरोपी अटक, उर्वरित फरार
पैसे घेण्यासाठी अपहरणकर्ते येताच पोलिसांनी एन्ट्रीही मारली. मुख्य आरोपी राहुलला पोलिसांनी अटक केली. मात्र त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. अशा प्रकारे पोलिसांनी शेख बबईची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. चंदननगर आयुक्तालयाचे एसीपी III अली रझा यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.