डिझेल द्या, बेपत्ता मुलीला शोधतो; उत्तर प्रदेश पोलिसांनी दिव्यांग महिलेकडून घेतले पैसे 

By पूनम अपराज | Published: February 2, 2021 09:34 PM2021-02-02T21:34:44+5:302021-02-02T21:36:27+5:30

Missing Complaint : आयुक्त कार्यालयाबाहेर स्थानिक माध्यमांशी बोलताना गुडिया नावाच्या विधवा महिलेने सांगितले की, तिने गेल्या महिन्यात आपल्या मुलीच्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिस त्यांना मदत करत नाहीत.

Give Diesel, finds the missing girl; Uttar Pradesh police took money from a handicaped woman | डिझेल द्या, बेपत्ता मुलीला शोधतो; उत्तर प्रदेश पोलिसांनी दिव्यांग महिलेकडून घेतले पैसे 

डिझेल द्या, बेपत्ता मुलीला शोधतो; उत्तर प्रदेश पोलिसांनी दिव्यांग महिलेकडून घेतले पैसे 

Next
ठळक मुद्देत्या महिलेने सांगितले की, 'पोलीस सांगतात आम्ही शोधत आहोत. पुष्कळ वेळा ते माझा अपमान करतात आणि माझ्या मुलाच्या चारित्र्यावर प्रश्न विचारतात आणि म्हणतात की, ही मुलीची चूक असेल.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका दिव्यांग महिलेने आरोप केला आहे की, तिने गेल्या महिन्यात एका नातेवाईकाने पळवून नेलेल्या तिची अल्पवयीन मुलगी शोधून काढावी यासाठी तिने स्थानिक पोलिसांच्या गाडीत डिझेल भरण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये दिले आहे. या पोलिसांविरोधात तक्रार घेऊन कुबड्यांच्या मदतीने चालणारी एक महिला सोमवारी कानपूर पोलिस प्रमुखांकडे पोहोचली. आयुक्त कार्यालयाबाहेर स्थानिक माध्यमांशी बोलताना गुडिया नावाच्या विधवा महिलेने सांगितले की, तिने गेल्या महिन्यात आपल्या मुलीच्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिस त्यांना मदत करत नाहीत.

त्या महिलेने सांगितले की, 'पोलीस सांगतात आम्ही शोधत आहोत. पुष्कळ वेळा ते माझा अपमान करतात आणि माझ्या मुलाच्या चारित्र्यावर प्रश्न विचारतात आणि म्हणतात की, ही मुलीची चूक असेल. पोलिस पुढे म्हणतात, आमच्या गाडीत डिझेल भरा, आम्ही तुमच्या मुलीला शोधण्यासाठी जाऊ. तसेच पीडित महिला पुढे म्हणाली, 'बर्‍याचदा पोलीस म्हणतात येथे-तेथे जाऊया. मी पोलिसांना लाच दिली नाही, मी खोटे बोलणार नाही. पण हो, त्यांच्या गाड्यांमध्ये मी डिझेल भरले आहे. मी त्यांना 3-4 वेळा पैसे दिले आहेत. त्या पोलीस चौकीवर दोन पोलीस आहेत. त्यातील एक जण मला मदत करीत आहे आणि दुसर्‍याने मला मदत केली नाही.

डिझेलसाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्याने एका नातेवाईकाकडे कर्ज घेतले असल्याचे तिने सांगितले. माध्यमांशी बोलताना दिव्यांग महिला म्हणाले, 'मी पोलीस प्रमुखांना सांगितले की, मी डिझेलसाठी 10-15 हजार रुपयांची व्यवस्था केली आहे. पण आता बाकी कुठे द्यायचे.


 

गांजा पिऊ नका सांगितल्याने तरुणांनी खांबाला डोके आपटून तरुणाची केली हत्या 

महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी ट्विट केले की, संबंधित पोलिस चौकीच्या प्रभारी पोलिसाला हटविण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात एका वयस्कर महिलेला पोलिस स्टेशन आयुक्त कार्यालयात आणताना दाखवले आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, महिलेची मुलगी शोधण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. कानपूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांनी माध्यमांना सांगितले की, 'आम्ही पोलीस स्टेशन प्रभारी यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. महिलेने केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जर कोणी दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई केली जाईल.

Web Title: Give Diesel, finds the missing girl; Uttar Pradesh police took money from a handicaped woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.