भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या; पोलीस आयुक्तालयाचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 09:37 PM2020-01-24T21:37:04+5:302020-01-24T21:38:27+5:30

कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने असे निर्देश देण्यात आले आहेत.

Give Information about the tenants to the police; Directions of Police Commissioner office | भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या; पोलीस आयुक्तालयाचे निर्देश 

भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या; पोलीस आयुक्तालयाचे निर्देश 

Next
ठळक मुद्देभाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबत माहिती देणे बंधनकारक आहेया आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कारवाईस पात्र राहील, असे देखील पोलीस आयुक्तालयाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावी, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत. दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने असे निर्देश देण्यात आले आहेत.

कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याच्या शक्यता गृहित धरुन फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ च्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १० (२) कलम जारी केले आहे. त्यानुसार आपल्याकडे भाडेकरु ठेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही घरमालकाने संबंधित भाडेकरुची संपूर्ण माहिती त्या - त्या संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय आपले घर भाड्याने देऊ नये. तसेच भाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे, असे निर्देशात पोलीस आयुक्तांनी नमूद केले आहे.

दरम्यान, विदेशी नागरिकास भाडेकरु म्हणून ठेवायचे असल्यास संबंधित विदेशी नागरिकाचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्रमांक, पासपोर्ट दिल्याचे ठिकाण आणि तारीख, पासपोर्ट वैधतेची मुदत, व्हिसा क्रमांक, वर्गवारी, व्हिसा वैधतेची मुदत आदी माहिती पोलिसांकडे सादर करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कारवाईस पात्र राहील, असे देखील पोलीस आयुक्तालयाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Web Title: Give Information about the tenants to the police; Directions of Police Commissioner office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.