छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:33 PM2018-10-29T15:33:41+5:302018-10-29T15:33:53+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन:धमकी पत्राबाबत कार्यकर्ते संतप्त येवला : आमदार छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेकरण्यात आली आहे. येवला तहसिलदार रोहिदास वारु ळे यांनी निवेदन स्वीकारले.

 Give Z-plus security to Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

Next
ठळक मुद्देभुजबळ यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. भविष्यात भुजबळ यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास त्यास शासन जबाबदारी राहील असे निवेदनात म्हटले आहे.


राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन:धमकी पत्राबाबत कार्यकर्ते संतप्त


येवला : आमदार छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेकरण्यात आली आहे. येवला तहसिलदार रोहिदास वारु ळे यांनी निवेदन स्वीकारले. सोमवारी सकाळी टपालाद्वारे अज्ञात इसमाने आमदार छगन भुजबळ यांना मनुस्मृतीस विरोध करीत राहील्यास दाभोळकर, पानसरे यांच्या प्रमाणे तुमचीही हत्या करण्यात येईल. अशी धमकी दिली. विघातक प्रवृत्तीच्या लोकांनी निनावी पत्र पाठवून समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पत्रामुळे भुजबळ यांच्या जिवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भुजबळ यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. भविष्यात भुजबळ यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास त्यास शासन जबाबदारी राहील असे निवेदनात म्हटले आहे.

सदर प्रसंगी उषाताई शिंदे, अरु ण थोरात, बाळासाहेब लोखंडे, तालुकाध््यक्ष साहेबराव मढवई, विधानसभाध्यक्ष वसंत पवार, युवक रा.कॉं. तालुकाध्यक्ष मोहन शेलार, दिपक लोणारी, जी प सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वाघ, अकबर शाह, डॉ. संकेत शिंदे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, गणपत कांदळकर, सचिन कळमकर, देवीदास शेळके, भुषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, अलका जेजुरकर, विमल शाह, विष्णूपंत क-हेकर, गोटु मांजरे, साहेबराव आहेर, अशोक मेंगाणे, गजानन गायकवाड, अंबादास शिनगर, सचिन सोनवणे, गोरख काळे, भाऊसाहेब कळसकर अदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (२९ येवला भुजबळ निवेदन)

्््््््््

Web Title:  Give Z-plus security to Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.