Prashant Kishor : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या गोव्यातील कार्यालयात ड्रग्ज सापडलं; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 10:37 AM2022-02-12T10:37:29+5:302022-02-12T11:12:19+5:30
Prashant Kishor And Goa Assembly Elections 2022 : गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या I-PAC या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या गोव्यातील कार्यालयात ड्रग्ज सापडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या I-PAC या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचं काम पाहत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या कंपनीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिम भागातील अनेक बंगल्यांवर छापेमारी केली. या परिसरातील आठ बंगले हे प्रशांत किशोर यांच्या आय पॅक या कंपनीने भाडे तत्त्वावर घेतले आहेत. या बंगल्यावर मारलेल्या छाप्यात एका 28 वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ अमली पदार्थ सापडले आहेत. या कर्मचाऱ्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भाजपचा २०२४ मध्ये पराभव शक्य, पण...; राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सांगितलं गणित
निवडणूक (Election) रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) संभाव्यतेबद्दल आपले मत उघडपणे मांडले आहे. "भाजपनं हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोककल्याणकारी धोरणांचे भक्कम आख्यान तयार केलं आहे. विरोधी पक्षांना यापैकी किमान दोन आघाड्यांवर भाजपला मात द्यावी लागेल," असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, 2024 मध्ये भाजपला पराभूत करू शकणारी अशी विरोधी आघाडी उभारण्यास मदत करू इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितलं.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य आहे. मात्र विरोधकांच्या सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपला पराभूत करणं कदाचित शक्य नाही. मला अशी विरोधी आघाडी तयार करायची आहे, जी 2024 मध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊ शकेल, असं प्रशांत किशोर यावेळी म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाथतीत यावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी बोलताना लोकसभेच्या 200 जागांचा उल्लेक केला, ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्या थेट टक्क होणार आहे. या ठिकाणी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं 95 जागा मिळवल्या आहे, तसंच त्या 195 मध्ये बदलू शकतात. "ज्या पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल त्यांना कमीतकमी 5 ते 10 वर्षांची रणनिती तयार करावी लागेल. हे पाच महिन्यांत होणं अशक्य आहे," असंही ते म्हणाले.