चोरी प्रकरणात संशयिताला जामीन मंजूर, कुडचडे पाेलिसांनी केला होता गुन्हा दाखल

By सूरज.नाईकपवार | Published: April 19, 2023 10:24 AM2023-04-19T10:24:48+5:302023-04-19T10:25:09+5:30

३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी-शर्तींसह जामीन

Goa Crime Suspect granted bail in theft case Kudchade police registered a case | चोरी प्रकरणात संशयिताला जामीन मंजूर, कुडचडे पाेलिसांनी केला होता गुन्हा दाखल

चोरी प्रकरणात संशयिताला जामीन मंजूर, कुडचडे पाेलिसांनी केला होता गुन्हा दाखल

googlenewsNext

सूरज पवार, मडगाव: दक्षिण गोव्यातील  कुडचडे येथील चोरी प्रकरणात संशयित पाल चिमा याला न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर केला. ३० हजार रुपयांचा वैयक्तिक बाॅण्ड व तितक्याच रक्केमचा हमीदार, न्यायालयाच्या परवानगी शिवाय गोव्याबाहेर न जाणे आदी अटी संशयिताला यावेळी घालण्यात आले आहेत. कुडचडे पाेलिसांनी संशयित पाल याच्यासमवेत मुझार शेख व झेड. बी. शेख यांच्यावर भादंसंच्या ४५७ व ३८० कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.

न्यायालयात सरकारी पक्षाने संशयित पाल हा परप्रांतिय असून, त्याची वृत्ती गुन्हेगारी स्वरुपाची आहे, जामिन मिळाल्यास न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी तो गैरहजर राहण्याचा धोका आहे, त्याच्याविरोधात अनेक खटले न्यायालयात प्रलंबीत असून त्याचा जामिन अर्ज फेटाळावा अशी मागणी केली तर या चोरी प्रकरणातील अन्य दोन संशयितांना जामिनावर सोडण्यात आले असून, पालला अटक केल्यानतंर तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील तपास पूर्ण झालेला सबब त्याला जामीन मंजूर केला जात असल्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: Goa Crime Suspect granted bail in theft case Kudchade police registered a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.