Suchana Seth : मुलाच्या हत्येनंतर पहिल्यांदाच सूचना सेठ आणि नवरा पोलीस ठाण्यात आमने-सामने; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:56 PM2024-01-14T12:56:19+5:302024-01-14T13:10:33+5:30

Suchana Seth : सूचना सेठने आपल्या चार वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर, तिने त्याचा मृतदेह एका बँगमध्ये भरला.

goa murder case ceo Suchana Seth venkatraman face to face in police station | Suchana Seth : मुलाच्या हत्येनंतर पहिल्यांदाच सूचना सेठ आणि नवरा पोलीस ठाण्यात आमने-सामने; म्हणाले...

Suchana Seth : मुलाच्या हत्येनंतर पहिल्यांदाच सूचना सेठ आणि नवरा पोलीस ठाण्यात आमने-सामने; म्हणाले...

आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या AI स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठचा पती वेंकटरमन यांनी गोवा पोलिसांसमोर महत्त्वाची माहिती दिली आहे. वेंकटरमन म्हणाले की, सूचना सेठ हिने गेल्या पाच आठवड्यांपासून मुलाला भेटू दिलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचनाशी पंधरा मिनिटं बोलणं झालं. मुलाच्या हत्येनंतर पहिल्यांदाच सूचना सेठ आणि वेंकटरमन समोरासमोर आले होते.

वेंकटरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आणि पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संभाषणादरम्यान, सूचना प्रत्येक गोष्टीसाठी वेंकटरमनला दोष देत राहिली. सूचना सेठचा पती वेंकटरमन हे तपास अधिकारी (IO) परेश नाईक यांच्यासमोर त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी बेंगळुरूहून कळंगुट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. रविवारी कळंगुट पोलीस ठाण्यात काही प्रमुख साक्षीदार हजर करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.

उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये सूचना सेठने आपल्या चार वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर, तिने त्याचा मृतदेह एका बँगमध्ये भरला आणि बंगळुरूला परत जाण्यासाठी टॅक्सी केली, परंतु 8 जानेवारी रोजी तिला अटक करण्यात आली. वेंकटरमन यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला, त्यांच्या वकिलाने सांगितले की, वेंकटरमन आपल्या मुलाच्या जाण्यामुळे नाराज आहेत. 

वकिलाने सांगितलं की, या घटनेबाबत एकच अंदाज बांधला जात आहे तो म्हणजे कदाचित सूचनाला तिच्या मुलाने वेंकटरमन यांना भेटावं, त्यांच्याशी भावनिकरित्या कनेक्ट व्हावं हे मान्य नव्हतं. गेल्या एक वर्षापासून बंगळुरू येथील कौटुंबिक न्यायालयात मुलाच्या ताब्याबाबत खटला सुरू होता. सुरुवातीला न्यायालयाने वडिलांना मुलाशी फोनवर किंवा व्हिडीओ कॉलद्वारे बोलण्याची परवानगी दिली होती. नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने वडिलांना मुलाला घरी भेटण्याची परवानगी दिली होती. 

2020 मध्ये पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू झाली. प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर आईला मुलाचा ताबा मिळाला. तेव्हापासून सूचनाने आपल्या मुलाला पती वेंकटरमन यांना भेटू दिले नाही. वेंकटरमन यांनी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यावर न्यायालयाने नुकतेच आदेश दिले की वेंकटरमन आपल्या मुलाला दर रविवारी भेटू शकतील.
 

Web Title: goa murder case ceo Suchana Seth venkatraman face to face in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.