कोंडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास, शेजारच्या महिलेवर फिर्यादीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:30 PM2023-10-29T12:30:43+5:302023-10-29T12:30:52+5:30
सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात चोरीची घटना घडली. घरात लपवून ठेवलेली चावी घेऊन शेजारी राहणार्या महिलेने घरात चोरी केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला. याप्रकरणी एकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविवारी सकाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नागनाथ बजीरंग भोसले (वय ४७, रा. कोंडी, ता. उ. सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिता भैस (वय ३५) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दोन ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फिर्यादी हे घराला कुलूप लावून चावी घरात लपवून ठेवली होती. ही या चावीच्या साहाय्याने सुनिता भैस यांनी चोरी केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या घटनेत १ लाखाचे दीड तोळ्याचे गंठण, १ लाखांचे दीड तोळ्यांचे लॉकेट, १० हजार रूपये रोख रक्कम, १२ हजाराचे २५० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २ लाख २२ हजार रूपयांचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महिंद्रकर करीत आहेत.