घरमालकीणीचा खून करून पळविले होते सोने-चांदीचे दागिने, आरोपी अटकेत

By परिमल डोहणे | Published: May 18, 2023 11:17 PM2023-05-18T23:17:24+5:302023-05-18T23:17:38+5:30

चंद्रपुरातील हत्या प्रकरण, आरोपीकडून सहा तोळे सोन्याचे दागिने जप्त

Gold and silver ornaments were stolen after murdering the landlady, accused arrested | घरमालकीणीचा खून करून पळविले होते सोने-चांदीचे दागिने, आरोपी अटकेत

घरमालकीणीचा खून करून पळविले होते सोने-चांदीचे दागिने, आरोपी अटकेत

googlenewsNext

परिमल डोहणे, चंद्रपूर: दोन महिन्यांच्या घरभाड्याच्या थकीत रकमेवरून झालेल्या वादातून भाडेकरू अनुप सदानंद कोहपरे याने घरमालकिणीची हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली होती. या प्रकरणाच्या तपासात घरमालकिणीचा खून करून त्याने सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोकडही पळविल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन सोन्याचे गोप, मंगळसूत्र, तीन अंगठ्या, कानातले असे सहा तोळे सोन्याचे दागिने, टीव्हीचा सेटटाॅप बॉक्स, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, मोबाइल आणि रोख १ हजार रुपये जप्त केले आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली येथील अनुप कोहपरे मागील काही वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे रोजगाराच्या शोधात आला होता. त्याला एका हॉटेलमध्ये कामही मिळाले. त्यानंतर तो चोरखिडकी येथील शर्मिला सकदेव यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याच्याकडे मागील काही महिन्यांचे घरभाडे थकीत होते. आर्थिक चणचणीमुळे घरभाड्यासाठी शर्मिलाने अनुपला हटकले. दोघात भांडण होऊन धक्काबुकी झाल्याने शर्मिला खाली पडल्या होत्या. त्यादरम्यान अनुपने तिचा गळा दाबून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेने अनुप कोहपरेला अटक केली. घटनेचा तपास रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील गोपाले करत आहेत.

अशी आली चोरीची घटना समोर

शर्मिला यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान, शर्मिला यांची मुलगी घरी आल्यानंतर तिला घरातील साहित्यही लंपास झाले असल्याचे दिसून आले. तिने याबाबतची माहिती पोलिसांना देताच रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी कसून तपास करत आरोपीकडून दागिने व रोकड असा मुद्देमाल जप्त केला.

दोन दिवसांची पोलिस कोठडी

अनुप कोहपरेला रामनगर पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी दोन दिवसांचा पीसीआर मागितला. न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रहस्यमय कथा वाचनाचा छंद

अनुप हा पदवीच्या व्दितीय वर्षाला होता. त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांच्या बॅगेत नेहमीच पुस्तके असायची. विशेष म्हणजे त्याला रहस्यमय कथा असलेली पुस्तके वाचण्याची जास्त आवड होती. पोलिसांना त्याच्या बॅगेत अशी पुस्तके आढळून आली आहेत.

 

Web Title: Gold and silver ornaments were stolen after murdering the landlady, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.