चक्क बुटात लपविली सोन्याची बिस्किटं, २ किलो सोन्याची तस्करी करणारा आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 08:37 PM2018-10-04T20:37:12+5:302018-10-04T20:37:52+5:30
मझार मोईन खान असं या प्रवाशाचे नाव असून तो बँकॉकहुन मुंबईला आला होता. तो भारतीय पासपोर्टधारक आहे
मुंबई - विमानतळावर एअर इंटेलिजन्सच्या कस्टम विभागाने एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालींवरुन त्यास ताब्यात घेतले. मझार मोईन खान असं या प्रवाशाचे नाव असून तो बँकॉकहुन मुंबईला आला होता. तो भारतीय पासपोर्टधारक आहे. हस्तगत करण्यात आलेली दोन सोन्याची बिस्किटं प्रत्येकी १ किलोग्रॅमचे आहे. या दोन्ही सोन्याच्या बिस्किटांची किंमत ५६ लाख १२ हजार १३० इतकी आहे. खानने प्रवासादरम्यान घातलेल्या शूजमध्ये ही सोन्याची बिस्कीट लपून ठेवून सोन्याची तस्करी करत होता. याप्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांनी कस्टम विभागातील कायदा 1962 अन्वये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विमानतळ कस्टम विभागाचे आयुक्त व्ही रामा मॅथीव्ह यांनी याबाबत माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.