पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 07:24 PM2018-07-10T19:24:34+5:302018-07-10T19:35:43+5:30
पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुणे मुक्कामनंतर पालखीने सासवडकडे प्रस्थान केले. यावेळी हडपसर भागात चाेरट्यांनी गर्दीचा फायदा उठवत महिलांच्या गळ्यातील चैन व मंगळसूत्र लांबवले. याप्रकरणी हडपसर व वानवडी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला असून एका गुन्ह्यात एका महिलेला अटक करण्यात अाली अाहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची तसेच तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामानंतर पुढे मार्गस्थ झाल्या. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अालेल्या महिलांना चाेरट्यांनी लक्ष केले तर हडपसर येथील रहिवासी जयकुमार बागणे हे पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यांच्या घरातील राेख रक्कम व दागिने असा एकूण 1 लाख 59 हजार 850 रुपयांचा एेवज चाेरुन नेला अाहे. हडपसर भागातील एका महिलेचे 67 हजार 500 रुपयांचे तर वानवडी भागातील एका महिलेच्या 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र चाेरट्यांनी लांबविले. हडपसर भागातीलच एका 23 वर्षीह महिलेच्या गळ्यातील 25 हजारांची साेन्याची चेन तर अाणखी एका गुन्ह्यात 20 हजार रुपयांची साेन्याची चेन चाेरट्यांनी गर्दीचा फायदा उठवूत चाेरुन नेली. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असून पाेलीस अधिक तपास करत अाहेत.
यापुर्वी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शनिवारी पुण्यात दाखल झाल्यानंतर डेक्कन परिसरातून दोन भाविकांचे मोबाईल तर दिघी येथून एका 48 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत. याप्रकरणी डेक्कन आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.