सुनेने उघड केली तस्कर सासूची पोलखोल, टॉयलेटच्या टाकीतून निघाल्या दारूच्या बाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:10 PM2022-05-19T21:10:21+5:302022-05-19T21:18:22+5:30
Liquor Smuggling : दारूचा अवैध धंदा करणाऱ्या सासूला पोलिसांना पकडून देऊन सुनेने दारूमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला होता.
गोपालगंज : बिहारमध्ये दारू बंदी आहे. दारूची अवैध तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या घटनेमध्ये गोपालगंजमधील मांझगढ पोलीस स्टेशन परिसरात सासू आणि सुनेची एक विचित्र कहाणी समोर आली आहे. ज्या कहाणीत दारूचा अवैध धंदा करणाऱ्या सासूला पोलिसांना पकडून देऊन सुनेने दारूमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला होता.
काय प्रकरण आहे ते जाणून घ्या?
खरं तर, हे प्रकरण फुलवारिया गावातील आहे, जिथे सासू दारूचा अवैध व्यवसाय करायची, पण तिच्या सुनेला हा काळा धंदा आवडत नव्हता. सासूने दारुची तस्करी करण्यासाठी घराच्या टॉयलेट टाकीला लागून मोठा खड्डा खोदला होता, त्यात दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या. सुनेने नाराज होऊन याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना पोहोचणे अवघड असलेल्या ठिकाणी दारूची टाकी बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली
गोपालगंजचे पोलीस अधीक्षक आनंद कुमार यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे फुलवारिया गावात टाकलेल्या छाप्यात ५२ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 42 लिटर देशी दारू, दोन किलो नौसदार, गॅस सिलिंडर, दारू बनवण्याचे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, महिला दारू तस्कर शारदा देवी हिला अटक करण्यात आली आहे. घरातच मिनी दारूचा कारखाना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आता आणखी आरोपींचा शोध घेत आहेत.