एसबीआय बँकेत मोठी चोरी! सुरुंग लावून रात्रीत चोरट्यांनी करोडो रुपयांचे सोने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:15 PM2022-12-23T15:15:33+5:302022-12-23T15:16:29+5:30
रात्रीत चोरट्यांनी एसबीआय बँक शाखेतून सुरुंग लावून करोडो रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्रीत चोरट्यांनी एसबीआय बँक शाखेतून सुरुंग लावून करोडो रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील एसबीआय बंख शाखेत ही चारी झाली आहे, या चोरीचा तपास पोलीस करत आहेत.
गुरुवारी रात्री कानपूर मधील भौती येथील एसबीआय शाखेच्या पाठिमागून चोरांनी सुरुंग लावून भिंत फोडून करोडो रुपयांचे सोने लंपास केले आहे. सकाळी बँकेतील कर्मचारी जेव्हा कामासाठी शाखेत आले, यावेळी त्यांना बँकेच्या गोल्ड चेस्टचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी लुटणार होती महिला, सुंदरता बघून भाळला विवाहित पुरूष आणि मग...
कानपूर येथील सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. त्यामुळे आता पोलीस रात्रिचे गस्तीवर प्र्सचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री तिहेरी खुनाचे प्रकरण समोर आले होते, तर दुसऱ्याच दिवशी चोरीचे प्रकरण समोर आले आहे. या बँकेतील शाखेच्या पाठिमागे मोठी झाडी आहे, या झाडीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली आहे. बँकेच्या पाठिमागे सुरुंग लावून चोरट्यांनी भिंत फोडली, चोरट्यांनी बँकेत प्रवेश करुन गोल्ड रुमचा दरवाजा तोडून बँकेत असणारे सर्व सोने लंपास केले. करोडो रुपयांचे सोने या शाखेत असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थलावरील सर्व फिंगरप्रिंट घेतले आहेत, सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत, पोलिसांनी या तपासासाठी टीम बनवल्या आहेत.
एसबीआय बँक शाखेत कर्जासाठी ठेवलेले सोने चोरट्यांनी लुटले आहे. या गोल्ड रुमचा दरवाजा मोठ्या लोखंडी रॉडने तोडला असल्याचे दिसत आहे. यात किती रुपयांचे सोने चोरीला गेले याची माहिती बँक कर्मचारी घेत आहेत.