सोनाराने घातला गुंतवणूकदारांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 01:42 AM2020-03-16T01:42:10+5:302020-03-16T01:42:19+5:30

पश्चिमेतील गोपीनाथ चौक परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सचा मालक गारळे याने भिशी योजना सुरू केली होती. भिशी भरणाऱ्यांना त्याने आपल्या दुकानातून दागिने बनवल्यास घडणावळ घेतली जाणार नाही, असे प्रलोभन दाखवले.

Goldsmiths Investor Clutter | सोनाराने घातला गुंतवणूकदारांना गंडा

सोनाराने घातला गुंतवणूकदारांना गंडा

Next

डोंबिवली : भिशी चालू केल्यास दागिने बनवताना घडणावळीचा खर्च घेतला जाणार नाही, असे प्रलोभन दाखवून एका सोनाराने गुंतवणूकदारांना चार लाख ८८ हजार ४४६ रुपयांचा गंडा घातल्याची घटना पश्चिमेत उघडकीस आली आहे. दुकान बंद करून पळून गेलेल्या अजित गारळे (२४, रा. कोपर रोड) याच्याविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.

पश्चिमेतील गोपीनाथ चौक परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सचा मालक गारळे याने भिशी योजना सुरू केली होती. भिशी भरणाऱ्यांना त्याने आपल्या दुकानातून दागिने बनवल्यास घडणावळ घेतली जाणार नाही, असे प्रलोभन दाखवले. त्याला बळी पडलेल्या जयेश जाधव (२९, रा. कुंभारखाणपाडा) यांनी जानेवारी २०१९ पासून प्रतिमहिना पाच हजार रुपये भिशी योजनेत भरण्यास सुरुवात केली. जानेवारी २०२० मध्ये जाधव यांनी सहा तोळ्यांचे मंगळसूत्र बनवायचे असल्याचे गारळे याला सांगितले. त्यावेळी, गारळे याने सोन्याचा दर ४० हजार रुपये असल्याचे जाधव यांना सांगत मंगळसूत्र बनविण्यासाठी दोन लाख ४० हजारांचा खर्च सांगितला. त्यानुसार, जाधव यांनी ३८ ग्रॅम सोन्याचे दागिने त्याला दिले. त्या दागिन्यांची किंमत गारळेने एक लाख ५५ हजार रुपये होईल, असे जाधव यांना सांगितले. त्यानंतर, जाधव यांनी मंगळसूत्र बनविण्यासाठी १२ हजार रुपये जमा केले. भिशीचे ७० हजार रुपये गारळेकडे जमा होते. दोन लाख ३७ हजार रुपयेही जाधव यांनी जमा केले. मार्चमध्ये जाधव यांना सहा तोळ्यांचे मंगळसूत्र गारळे देणार होता. त्यामुळे, ९ मार्चला लक्ष्मी ज्वेलर्समध्ये जाधव गेले असता हे दुकान बंद होते. जाधव यांनी गारळेशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गारळेचा फोन बंद असल्याने त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेही बंद असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले.

अन्य गुंतवणूकदारांचीही केली फसवणूक
लक्ष्मी ज्वेलर्सच्या गारळे याने जाधव यांच्यासह परिसरात राहणाºया कल्पेश कळंबे, सुचिता पिरवरे, गीता कांबळे, अरुण नरसले तसेच अन्य गुंतवणूकदारांचीही फसवणूक केली आहे.

Web Title: Goldsmiths Investor Clutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.