Video - "बाबा, मला घेऊन जा नाहीतर शाहरुख मला मारून टाकेल"; महिलेसोबत आक्रित घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:47 IST2026-02-25T12:46:18+5:302026-02-25T12:47:48+5:30

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

gonda woman death under suspicious circumstances video sparks questions | Video - "बाबा, मला घेऊन जा नाहीतर शाहरुख मला मारून टाकेल"; महिलेसोबत आक्रित घडलं

Video - "बाबा, मला घेऊन जा नाहीतर शाहरुख मला मारून टाकेल"; महिलेसोबत आक्रित घडलं

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिला आपल्या वडिलांकडे आपल्याला माहेरी घेऊन जाण्याची विनंती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, नगर कोतवाली परिसरातील कटहा घाट जवळ राहणाऱ्या एका महिलेचा मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं सांगितलं जात असलं तरी पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला असं म्हणताना ऐकू येत आहे की, "बाबा, येऊन मला घेऊन जा, नाहीतर शाहरुख मला मारून टाकेल. त्याने माझा फोनही तोडला आहे. जर मला काही झालं तर त्याला शाहरुख जबाबदार असेल." हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

नगर कोतवाल बिंदेश्वरी मणी यांनी फोनवरून माहिती दिली की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मूळची जालौन येथील रहिवासी होती आणि तिचं लग्न दहा वर्षांपूर्वी गोंडा येथील रहिवासी शाहरुख याच्याशी झालं होतं. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चार महिने जुना असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलीस हा व्हिडीओ कोणत्या परिस्थितीत बनवला गेला होता आणि त्यावेळी कोणती तक्रार नोंदवली गेली होती का, याचा शोध घेत आहेत.
 

Web Title : उत्तर प्रदेश में महिला की मौत से सवाल; वीडियो में डरावना खुलासा।

Web Summary : उत्तर प्रदेश के गोंडा में एक महिला की संदिग्ध मौत की जांच हो रही है। एक वायरल वीडियो में उसे अपने पिता से घर ले जाने की गुहार लगाते हुए दिखाया गया है, उसे डर था कि उसका पति, शाहरुख, उसे मार देगा। पुलिस मौत और वीडियो की जांच कर रही है।

Web Title : Woman's death in Uttar Pradesh raises questions; video reveals fears.

Web Summary : A woman's suspicious death in Gonda, UP, is under investigation. A viral video shows her pleading with her father to take her home, fearing her husband, Shahrukh, would kill her. Police are investigating the circumstances surrounding her death and the video's origin.