लॉकडाऊनची ऐशी कि तैशी! हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी गुड फ्रायडेची सामूहिक प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:25 PM2020-04-10T23:25:08+5:302020-04-10T23:30:45+5:30

हॉटस्पॉटमध्ये आज गुड फ्रायडेनिमित्त प्रार्थनेसाठी एकत्र आलेल्या सहा जणांना धारावी पोलिसांनी अटक केली.

On Good Friday group prayer at a hotspot, voilent of lockdown rules, police arrested 6 people pda | लॉकडाऊनची ऐशी कि तैशी! हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी गुड फ्रायडेची सामूहिक प्रार्थना

लॉकडाऊनची ऐशी कि तैशी! हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी गुड फ्रायडेची सामूहिक प्रार्थना

googlenewsNext
ठळक मुद्देसहा जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली.

मुंबई - कोरोनाच्या संसर्गाने मुंबईत हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. मुंबईत कोरोनाचे चार हॉटस्पॉट आहेत. त्यापैकी धारावी परिसर देखील हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याच हॉटस्पॉटमध्ये आज गुड फ्रायडेनिमित्त प्रार्थनेसाठी एकत्र आलेल्या सहा जणांना धारावी पोलिसांनीअटक केली.
  

सहा जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. तसेच धार्मिक स्थळं देखील बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, अनेकजण लॉगडाऊनच्या नियमांना हरताळ फासत धार्मिक स्थळी सामूहिक प्रार्थनेसाठी गर्दी केल्याचे उघडकीस आले आहे. अशीच घटना धारावीत गुड फ्रायडेच्या दिवशी घडली. त्यांना धारावी पोलिसांनी भा. दं. वि. कलम १८८, २६९,  २७० आणि साथीरोग  प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ सह म. पो. का. कलम ३७ (१)(३) १३५, महाराष्ट्र कोविड १९ चे नियम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: On Good Friday group prayer at a hotspot, voilent of lockdown rules, police arrested 6 people pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.