‘गुगल’वर फेरफार करीत वाढले गंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 07:12 AM2021-07-31T07:12:56+5:302021-07-31T07:13:42+5:30
Crime News: कुठल्याही माहितीच्या शोधासाठी आपसूकच गुगलच्या सर्च इंजीनवर आपण पोहोचतो. मात्र, याच सर्च इंजीनमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत.
मुंबई : कुठल्याही माहितीच्या शोधासाठी आपसूकच गुगलच्या सर्च इंजीनवर आपण पोहोचतो. मात्र, याच सर्च इंजीनमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत. अचूक माहिती मिळावी, या उद्देशाने खासगी, शासकीय आस्थापनांचे उपलब्ध तपशील बदलण्याचे अधिकार ‘गुगल’ या सर्च इंजीनने वापरकर्त्यांना दिले. याचाच गैरफायदा ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी ठग घेत आहेत. मुंबई, दिल्लीसह देशभरात असे प्रकार घडत आहेत.
गुगलच्या वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. सर्व्हेनुसार, प्रतिसेकंद जगभरातून ४० हजारांहून अधिक जण गुगलच्या सर्च इंजीनवर विविध प्रश्न, माहितीसाठी शोध घेतात. जवळची बँक शाखा, मोबाइल किंवा वीजबिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, दिशा दर्शविणाऱ्या नकाशासाठी गुगलचा उपयोग होतो. हे तपशील अचूक असावेत, यासाठी गुगलने सजेस्ट अॅण्ड एडिट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो.
ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या ठगांनी हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापना, हॉस्पिटल, हॉटेलचा अधिकृत संपर्क (पान ७ वर)