दोन लाखांच्या श्वानासाठी तरूणाचं अपहरण, आधी प्रेमाने मागितलं मग केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 09:44 AM2022-12-16T09:44:26+5:302022-12-16T09:48:39+5:30

Crime News : आरोपींवर श्वानाच्या मालकासोबत गैरवर्तन केल्यानंतर त्याचं अपहरण करून अलिगढला घेऊन गेल्याचा आरोप आहे. आता या गुंडांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Goons kidnapped dog owner picked from greater Noida send Aligarh | दोन लाखांच्या श्वानासाठी तरूणाचं अपहरण, आधी प्रेमाने मागितलं मग केली मारहाण

दोन लाखांच्या श्वानासाठी तरूणाचं अपहरण, आधी प्रेमाने मागितलं मग केली मारहाण

Next

Goons kidnapped dog owner : यूपीमध्ये एका श्वानासाठी तरूणाचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ग्रेटर नोएडाच्या बीटा 2 भागातील आहे. काही गुंडांना एक श्वान आवडला आणि त्यांनी त्याला प्रेमाने मागितला. पण जेव्हा श्वानाच्या मालकाने त्याला देण्यास नकार दिला तर गुंडांनी रागाच्या भरात तरूणाचं अपहरण केलं. 

आरोपींवर श्वानाच्या मालकासोबत गैरवर्तन केल्यानंतर त्याचं अपहरण करून अलिगढला घेऊन गेल्याचा आरोप आहे. आता या गुंडांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

अर्जेंटीनो प्रजातीचा हा श्वान न दिल्याने तरूणाचं अपहरण करण्यात आलं. या श्वानाची किंमत 2 लाख रूपये आहे. स्कार्पियो कारमध्ये आलेल्या गुंडांनी पीडित तरूणाचं अपहरण करून त्याला ग्रेटर नोएडाहून अलिगढला घेऊन गेले. रस्त्यात त्याला शिवीगाळ केली आणि मारहाणही केली.

पीडित तरूणाचा भाऊ राहुलने सांगितलं की, त्याच्या भाऊ शुभम याच्याकडे एक डोगो अर्जेंटीनो श्वान आहे. बुधवारी सायंकाळी शुभम त्याच्या श्वानाला बाहेर फिरवत होता. तेव्हाच अलिकगढला राहणारे विशाल, ललित आणि मोंटी स्कॉर्पियो कारने आले. त्यांना श्वान आवडल्याचं ते म्हणाले.

तिघांनीही धमकी दिली की, काहीही झालं तरी त्यांना हा श्वान हवा आहे आणि त्यानंतर त्यांनी शुभमला किडनॅप केलं. नंतर लगेच याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर पीडित कसातरी आपला जीव वाचवून आरोपींच्या तावडीतून पळून ग्रेटर नोएडा येथील आपल्या घरी आला. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Goons kidnapped dog owner picked from greater Noida send Aligarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.