अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:28 PM2022-05-26T15:28:16+5:302022-05-26T15:30:14+5:30
3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला
नवी दिल्ली - बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एक विवाहित व्यक्ती शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि काही दिवसांनी ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे प्रेम इतके वाढले की एके दिवशी दोघेही घर सोडून पळून गेले. आंतरधर्मीय प्रकरणामुळे पोलीसही सतर्क झाले. यानंतर दोघांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातून प्रियकर-प्रेयसीला अटक केली. हे संपूर्ण प्रकरण जादोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. स्त्री-पुरुष वेगवेगळ्या धर्माचे असल्याने पोलीसही सतर्क झाले आणि पूर्ण तयारीनिशी कारवाईला लागले. मनन अन्सारी असं विवाहित प्रियकराचे नाव आहे. मनन हा जादोपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. मनन अन्सारी यांनी सांगितले की, तो तीन मुलांचा बाप आहे. त्याचे पत्नीशी अनेकदा भांडण होते.
मननने पोलिसांना सांगितले की, घरगुती वादाला कंटाळून तो शेजारी राहणाऱ्या त्याच्याच गावातील मुलीशी बोलू लागला. 2 वर्ष संवाद सुरू होता आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. मनन अन्सारीने आरोप केला आहे की, त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडण होते. त्यामुळे त्याला पत्नीसोबत राहायचे नाही. त्याने सांगितले की त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न करायचे आहे. तर मुलीनेही मननशी लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात पाठवले आहे.
एसडीपीओ संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रौढ आहेत आणि स्वखुशीने घर सोडून पळून गेले होते. मनन अन्सारीच्या पत्नीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. जबाब नोंदवण्यासाठी प्रियकर-प्रेयसीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. या प्रेमप्रकरणाची आणि अपहरणाच्या घटनेची चर्चा दिवसभर गावात सुरू होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.